Indian Agriculture : शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या पंगतीसाठी गावोगावच्या भाकरी

कीर्तन महोत्सव म्हटला की अन्नदान आलेच. तालुक्यातील कान्नापूर येथे सुरू असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या पंगतीसाठी गावागावांतून भाकरीची मदत होते आहे.
Farmer Kirtan Festival
Farmer Kirtan FestivalAgrowon

Beed News धारूर, जि. बीड : कीर्तन महोत्सव (Farmer Kirtan Festival) म्हटला की अन्नदान (Food Donation) आलेच. तालुक्यातील कान्नापूर येथे सुरू असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या पंगतीसाठी गावागावांतून भाकरीची मदत होते आहे. एका हाके सरशी सर्व गावांतील सर्व समाजातून भाकरीचा ओघ सुरू होऊन शेतकरी एकजुटीचा वैचारिक जागर पाहायला मिळत आहे.

शेतकरी ऐक्याचा ध्यास घेऊन कमी खर्चात उच्च प्रतीचे वैचारिक प्रबोधन व्हावे, या उद्देशाने शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. गुरूवार (ता. ९) पर्यंत होणाऱ्या या महोत्सवानिमित्त पंगतीसाठी १४ गावांतील घराघरांतून भाकरी गोळा होत आहेत.

कीर्तन महोत्सवाचा शुक्रवारी (ता.३) पहिला दिवस होता. मात्र एकादशी असल्याने म्हातारगाव आणि मुंगी या गावच्या शेतकऱ्यांनी कीर्तन महोत्सवाच्या ठिकाणीच फराळाचे पदार्थ तयार केले.

Farmer Kirtan Festival
Indrajit Bhalerao : शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल

शनिवारी (ता. ४) सकाळी अंमला आणि रात्री मोहा गावातून भाकरी गोळा केल्या होत्या. अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न असल्याने कसा प्रतिसाद मिळेल, याची उत्सुकता होती. मात्र दोन्ही गावांतील महिलांनी मोठ्या आनंदाने भाकरी पाठविल्या.

हा सुखद अनुभव पाहायला मिळाला. या महोत्सवासाठी दररोज दोन ते अडीच हजार लोक उपस्थिती लावत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Farmer Kirtan Festival
Indian Agriculture : आनंद भरला आपल्या घरी...

या महोत्सवाचे संयोजक अॅड. अजय बुरांडे म्हणाले, ‘‘सर्व भाकरी जेव्हा पहिल्या दिवशी भोजन मंडपात उतरविल्या तेव्हा कार्यकर्तेही कौतुकाने त्याकडे पाहू लागले. गावातील घराघरांतून आलेल्या भाकरींची ओळख पुसली गेली होती.

ती भाकरी कोणत्या घरातून आली, ते घर कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे होते. हे आता कुणालाच ओळखता येत नव्हते. या भाकरी कोणत्याही घरातून आलेल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्याच्या आहेत, ही जाणीव प्रत्येकालाच प्रकर्षाने होत होती.’’

‘‘या सर्व जाती, धर्माच्या घरांतून आलेल्या भाकरींप्रमाणे शेतकऱ्यांची एकजूट व्हावी, असाच संदेश या भाकरी देत होत्या. शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत. सुखी झालेला शेतकरी जगाला सुखाचा घास देईल. त्यातून संतांनी पाहिलेले आनंदी समाजाचे स्वप्न साकार होईल.’’

अॅड. अजय बुरांडे, संयोजक, शेतकरी कीर्तन महोत्सव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com