भावनिक आवाहन नको, शेतकऱ्यांना मदत द्यावी

प्रत्यक्षात मदत द्यायचे सोडून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भावनिक साद घालून मदतीचे स्वप्न दाखवीत आहे. तसे पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

यवतमाळ : प्रत्यक्षात मदत द्यायचे सोडून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भावनिक साद (Eknath Shinde's Emotional appeal To Farmer) घालून मदतीचे स्वप्न दाखवीत आहे. तसे पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. नुकताच यवतमाळ जिल्ह्यात कृषिमंत्र्यांनी (Abdul Sattar) थातुर-मातुर दौरा आटोपून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला.

Crop Damage
Crop Damage : लाखांदूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

हा सर्व प्रकार बघता मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन ‘बोलाची कढी अन् बोलाचाच भात’ असल्याची टीका शेतकरी वारकरी संघटनेचे नेते सिकंदर शहा यांनी केली आहे.

Crop Damage
Fertilizer : ‘एक राष्ट्र एक खत’ धोरण केंद्राकडून लागू

अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात कापूस, सोयाबीनसह सर्वच पिकांची वाट लागली आहे. अशाही परिस्थितीत पीकविमा कंपनी, केंद्र तसेच राज्य सरकार मदतीबाबत गंभीर नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीची घोषणा वीस दिवस पूर्वीच केली.

मात्र प्रत्यक्षात आदेश २२ ऑगस्ट रोजी काढण्यात आला. हा जीआर सुद्धा शेतकऱ्यांची ओरड सुरू झाल्यानंतर काढण्यात आला. राज्याचे कृषिमंत्री तर नुकतेच यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्यात सुद्धा त्यांनी शेतकरी नेते तसेच शेतकऱ्यांसोबत चर्चा केली नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com