Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Crop Competition : पीक स्पर्धेत दुप्पट उत्पादकतेचा निकष

राज्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांतील शेतकऱ्यांकडून राबविण्यात येणाऱ्या पीक प्रयोगांकरिता पीक स्पर्धेच्या निकषांत यंदा बदल करण्यात आले आहेत.

मुंबई : राज्यातील पिकांची उत्पादकता (Crop Productivity) वाढविण्यासाठी विविध भागांतील शेतकऱ्यांकडून राबविण्यात येणाऱ्या पीक प्रयोगांकरिता (Crop Experiment) पीक स्पर्धेच्या (Crop Competition) निकषांत यंदा बदल करण्यात आले आहेत. पीक स्पर्धेसाठी तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन आहे, अशाच शेतकऱ्यांना पात्र समजण्यात येणार आहे. या आधी तालुक्यातील उत्पादकतेच्या दीडपट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पात्र समजले जात होते.

Agriculture Department
रब्बी हंगामातील पीक स्पर्धा

...असे निवडणार शेतकरी

पीक स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक उत्पादकतेच्या दीडपट उत्पादकतेला बक्षिसासाठी ग्राह्य धरण्यात येत होते. नव्या निर्णयानुसार दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादकता आहे अशाच शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात येणार आहे. त्याच्यामधून तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडण्यात येणार आहेत. त्याच शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय आणि जिल्हास्तरीय निकषांत पात्र ठरलेल्या आणि क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरविले जाणार आहे.

Agriculture Department
Chana Crop : तुमचा हरभरा मोसोंडतो आहे का?

दरवर्षी देण्यात येणारा विभागीय पीक स्पर्धेचा पुरस्कार देखील रद्द करण्यात आला आहे. यंदा केवळ तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरील पुरस्कार देण्यात येतील. या स्पर्धेतील राज्यस्तरीय पारितोषिक घेण्यासाठी तीन वर्षे सातत्याने भाग घ्यावा लागत होता. सध्या एकाच वर्षात स्पर्धा घेतली जात असल्याने अनेक ठिकाणी अवाजवी उत्पादन येणे, पीक स्पर्धा निकाल घोषित करण्यास विलंब लागणे, स्पर्धक शेतकरी पीक कापणीवेळी सर्व ठिकाणी अधिकारी अनुपस्थित असणे, राज्यस्तरीय बक्षीस एकाच वर्षाच्या उत्पादकतेवर अवलंबून असल्याने संबंधित स्पर्धकांच्या उत्पादकतेत सातत्य आहे की नाही हे समजून येत नाही. त्यामुळे या स्पर्धेत बदल करावा, अशी मागणी केली जात होती.

कृषी आयुक्त कार्यालयाने समित्यांचे पुनर्गठन, पात्रतेचे निकष, पीक स्पर्धा विजेत्यांची संख्या, स्वरूप, बक्षिसाची रक्कम, वेळापत्रक आदींमध्ये बदल करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार खरिपातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल ही ११ पिके तर ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या पाच पिकांसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. रब्बीच्या पिकांमधून तीळ हे पीक वगळण्यात आले आहे.

या आधी ही स्पर्धा तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा चार पातळ्यांवर होत होती. मात्र, आता विभागस्तरीय स्पर्धा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आधी स्पर्धेतील सहभागी शेतकऱ्याच्या १० आर क्षेत्रावरील सलग लागवड विचारात घेतली जात होती. नव्या नियमानुसार भात पिकासाठी लागवड २० आर क्षेत्रावर असणे आवश्यक आहे. तर अन्य पिकांसाठी एक एकर क्षेत्राची अट घालण्यात आली आहे.

या पीक स्पर्धेत जमीन नावावर असलेला कोणताही शेतकरी सहभागी होऊ शकतो. तालुका पातळीवर सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. तसेच जिल्हा पातळीवर स्पर्धेसाठी तालुका पातळीवर प्रथम तीन आलेले शेतकरी पात्र ठरतील. तसेच राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी जिल्हा पातळीवर प्रथम तीन क्रमांकाचे शेतकरी पात्र ठरतील.

पीकनिहाय

अर्जाची मुदत

खरीप हंगाम

मूग, उडीद : ३१ जुलै

भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल : ३१ ऑगस्ट

रब्बी हंगाम

ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस : ३१ डिसेंबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com