Dr. Sanjay Belsare : ‘मेरी’च्या महासंचालकपदी डॉ. बेलसरे यांना पदोन्नती

दरम्यान, सप्टेंबरमध्ये डॉ. बेलसरे यांच्याकडे औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
Dr. Sanjay Belsare
Dr. Sanjay BelsareAgrowon

नाशिक ः जलसंपदा विभागाचे (Department of Water Resources) उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे (Dr. Sanjay Belsare) यांच्याकडे संकल्पन, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालकांच्या रिक्तपदचा पदभार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य शासनाचे उपसचिव उद्धव दहिफळे यांनी तसा शासन आदेश जारी केला आहे.

Dr. Sanjay Belsare
Agriculture Electricity : अमरावती जिल्ह्यात २०३२ कृषिपंप जोडण्या प्रलंबित

दरम्यान, सप्टेंबरमध्ये डॉ. बेलसरे यांच्याकडे औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. पाणी वापर संस्थांची चळवळ राज्यभर पोचवण्यात डॉ. बेलसरे यांचा यापूर्वी सहभाग राहिला आहे.

सचिव व सचिव समकक्ष दर्जाचे कार्यकारी संचालक, महासंचालक संवर्गामध्ये त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. जलसंपदा विभागात कार्यरत असणारे कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com