Nashik Election : नाशिक पदवीधरमधून डॉ. तांबे यांना उमेदवारी

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या (टीडीएफ) राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेश अध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Nashik Election
Nashik ElectionAgrowon

नगर : नाशिक पदवीधर विधान परिषद मतदार संघाची निवडणूक होत आहे. येथून राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) (TDF) विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या (टीडीएफ) राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेश अध्यक्ष विजय बहाळकर (Vijay Baharkar) यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

Nashik Election
Nashik Rain : जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा

फेब्रुवारी २३ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर संघातून डॉ. तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. राज्य कार्यवाह हिरालाल पगडाल यांनी डॉ. तांबे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.

Nashik Election
Nashik Dry Port : निफाड येथे ड्रायपोर्ट उभारणीचा मार्ग मोकळा

डॉ. तांबे यांच्या उमेदवारीच्या प्रस्तावास माजी आमदार नानासाहेब बोरस्ते (नाशिक), संजय पवार (धुळे), राजेंद्र लांडे (नगर), भाऊसाहेब बाविस्कर (जळगाव), सुधीर काळे, जी. के. थोरात आदींनी एकमताने संमती दिली. डॉ. तांबे यांनी ‘टीडीएफ’च्या पाठिंब्यावर तीन वेळा विजय मिळविला आहे. चौथ्या वेळी देखील ते प्रचंड मताधिक्याने विजयी होतील,

अशी खात्री या बैठकीत व्यक्त करण्यात आली. ‘टीडीएफ’चे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, के. एम. ढोमसे, अरविंद कडलग, डी. जे. मराठे, सागर पाटील, मुरलीधर मांजरे, दत्तराज सोनावळे, किशोर जाधव, शिवाजी कामथे, सुशांत कविस्कर आदी उपस्थित होते.

मतदार नोंदणीला प्राधान्य

पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी महत्त्वाची असते. सत्ताधारी पक्ष त्यात अनेक अडथळे आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीडीएफ कार्यकर्त्यांनी गाफील न राहता समर्थक पदवीधरांची मतदार नोंदणी बिनचूक आणि काळजीपूर्वक करावी, असे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com