Dr. Indra Mani : आंतरराष्ट्रीय अकादमीचे फेलो म्हणून डॉ. मणी यांची निवड

अमेरिकेतील फ्लोरिडो विद्यापीठात मुख्‍यालय असलेल्‍या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्‍य वैज्ञानिक संस्‍थेचे फेलो म्‍हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांची निवड करण्‍यात आली आहे.
Dr. Indra Mani
Dr. Indra ManiAgrowon

परभणी : अमेरिकेतील फ्लोरिडो विद्यापीठात मुख्‍यालय असलेल्‍या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्‍य वैज्ञानिक संस्‍थेचे फेलो म्‍हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (VNMKV) कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांची निवड करण्‍यात आली आहे.

Dr. Indra Mani
Agricultural University : विद्यापीठाच्या संशोधनात शेतकऱ्यांना सहभागी करून घेणार : कुलगुरू डॉ.‌ मणी

जपानमधील क्‍योटो येथे ५ ते ९ डिसेंबर या कालावधीत आयोजित २० व्या ‘सीआयजीआर’ जागतिक परिषदेत अकादमीचे अध्‍यक्ष डॉ. फेड्रो एस. झाझुएटा यांच्‍या हस्‍ते डॉ. मणी यांना सन्‍मानित करण्‍यात आले. डॉ. मणी यांनी कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील तसेच देशातील कृषी संस्थांमध्ये काम करताना दिलेल्‍या योगदानाबाबत त्‍यांची फेलो म्‍हणून निवड करण्‍यात आली.

Dr. Indra Mani
Agriculture Drone : ड्रोनद्वारे फवारणी केल्यास प्रभावी कीड व्यवस्थापन शक्य ः कुलगुरू डॉ. मणी

‘शाश्वत कृषी उत्पादन – पाणी, जमीन, ऊर्जा आणि अन्न’ असा या परिषदेचा मुख्‍य विषय होता. यात जागतिक पातळीवर कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित संशोधक, अभियंते, प्राध्‍यापक, उद्योजक आणि विद्यार्थी, तज्ज्ञांनी सहभाग घेतला.

तसेच संशोधन, निष्कर्षांचे सादरीकरण केले. परिषदेत भारतातील कृषी विद्यापीठांमधून एकमेव मुख्‍य वक्‍ता म्‍हणून डॉ. मणी यांना विशेष आमंत्रित करण्‍यात आले. परिषदेत त्‍यांनी ‘शाश्वत अन्न-पाणी-ऊर्जा संबंध-भारतीय संदर्भ’ या विषयावर मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com