Lumpy Skin Disease : सांगली जिल्ह्यात २८ जनावरांना बाधा

‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील तालुक्यांमधील जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
lumpy skin disease
lumpy skin disease Agrowon

सांगली( Sangli) ः ‘लम्पी स्कीन’ (Lumpy skin disease) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवरील तालुक्यांमधील जनावरांना प्राधान्याने लसीकरण (Vaccination) करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यानंतर इतर तालुक्यातील जनावरांना लस देण्यात येईल. कंपन्यांकडून दोन-तीन दिवसांत लस उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन (Animal husbandry) अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली.

प्रशासनाकडे संसर्गाच्या प्रतिबंधात्मक लसीचे २१ हजार डोस प्राप्त झाले आहेत. १६ हजार लसींचे जनावरांना लसीकरण केले आहे. सुमारे पाच हजार लस आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवली आहे.’’ ते म्हणाले, ‘‘लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील जनावरांना झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील ‘लम्पी स्कीन’ने बाधित जनावरांची संख्या २८ झाली आहे. यापैकी १५ गायी बऱ्या झाल्या आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पराग म्हणाले, ‘‘जिल्ह्यात लम्पी स्कीनच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून बाधित क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या परिसरात असणाऱ्या जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. या जिल्ह्यांच्या सीमांना लागून असलेल्या तालुक्यातील जनावारांना आधी लस देण्यात येणार आहे. शासनाकडून उपलब्ध एका बाटलीची किंमत ६३० रुपये आहे. यातून १०० डोस म्हणजे शंभर जनावरांना लस देता येते. जसजशी लस उपलब्ध होईल, तशी वितरित करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात १० हजार लसीकरण करण्याच्या उद्देशाने एक लाख लस खरेदी करण्याचे नियोजन सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने लस खरेदी करण्यात येणार आहे.

जादा दराने लस दिल्यास कारवाई

काही पशुपालक ‘लम्पी स्कीन’च्या साथीने घाबरून खासगी डॉक्टरांकडून जनावरांना लस टोचून घेत आहेत. मात्र त्यासाठी जादा पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. डॉ. पराग म्हणाले, ‘‘लसीकरणासाठी जादा पैशाची मागणी होत असल्यास तसेच शासकीय डॉक्टर पैसे मागत असल्यास थेट जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा. जादा पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. या संकटाशी सामना करण्यासाठी वैद्यकीय सेवा देणाऱ्यांनी सेवा म्हणून काम करावे.’’

lumpy skin disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ लस मोफत मिळणार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com