‘पंदेकृवि’च्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. मालखेडे

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ संपल्याने व नवी नियुक्ती जाहीर झालेली नसल्याने या पदाचा तूर्त प्रभार देण्यात आला आहे.
PDKV
PDKVAgrowon

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (Dr. Panjabrao Deshmukh Agriculture University) कुलगुरू (PDKV Vice Chancellor) डॉ. विलास भाले (Vilas Bhale) यांचा कार्यकाळ संपल्याने व नवी नियुक्ती जाहीर झालेली नसल्याने या पदाचा तूर्त प्रभार देण्यात आला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे (Dr. Dilip Malkhede) यांनी सोमवारी (ता. ५) हा पदभार स्वीकारला.

PDKV
Cotton Rate : कापसाच्या वायद्यांवर सरसकट बंदी नाही

कुलगुरू म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ वयोमानानुसार संपला आहे. त्यामुळे या पदासाठी नवीन व्यक्तीचा शोध घेतला जात असून निवड प्रक्रिया राजभवनाकडून राबवली जात आहे. या पदासाठी अर्ज मागविलेले असून २९ ऑगस्टला संबंधितांच्या मुलाखतीही झाल्या. यातील ३० पैकी पाच जणांची नावे राजभवनाकडे पाठवून तेथे राज्यपाल मुलाखती घेतील.

त्यानंतर अंतिम नाव जाहीर केले जाईल, असे सांगितले जाते. मात्र, अद्याप ही पाच नावे राजभवनाकडे गेली किंवा नाही, याची कुठलीही माहिती स्थानिक स्तरावर उपलब्ध नाही. कुलगुरू निवृत्तीचा कालावधी माहिती असतानाही निश्‍चित वेळेत संबंधित पदावर दुसऱ्या पात्र व्यक्तीची नियुक्ती न होणे, हे एक कोडे समजले जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com