PDKV : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनला मुदतवाढीची शक्यता

सध्या रसायनमुक्त खाद्यान्नाची मागणी वाढत आहे. राज्यातही नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
PDKV AKOLA
PDKV AKOLA Agrowon

अकोला ः सध्या रसायनमुक्त खाद्यान्नाची मागणी (Chemical Free Food) वाढत आहे. राज्यातही नैसर्गिक शेतीला (Natural Farming) प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला (Biological Agriculture Mission) मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये जाहीर झालेले व प्रत्यक्षात २०२० पासून कार्यान्वित असलेल्या या मिशनची याच महिन्यात मुदत संपत आहे.

PDKV AKOLA
पंजाबराव देशमुख योजनेची यादी ग्राह्य धराः शेट्टी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२५ पर्यंत दुसरा टप्पा राबविण्याबाबत नुकतेच पुण्यात सूचक वक्तव्य केले. त्यामुळे प्रकल्पाला मुदतवाढ मिळण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.

अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनचे मुख्यालय आहे. प्रकल्प संचालक, उपसंचालक दर्जाचे अधिकारी या मिशनचा कारभार चालवत आहेत. स्वतंत्रपणे जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे.

PDKV AKOLA
PDKV, Akola : ‘पंदेकृवि’ च्या कुलगुरू निवडीकडे सर्वांच्या नजरा

प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून राज्यात सुमारे ३२ हजार एकरांवर हे काम सुरू असल्याचा दावा केला जातो. प्रकल्पात ८२०० शेतकरी जुळले आहेत. ४० शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्या आहेत. तर सुमारे ४२५ पेक्षा अधिक गट उभे राहिले आहेत. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचे फलित आता बाहेर येऊ लागले.

रसायन व विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला, फळांच्या उत्पादनाला चालना मिळत आहे. हा उत्पादित माल आता ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची साखळी तयार होत आहे. ठिकठिकाणी नैसर्गिक उत्पादनांचे साप्ताहिक बाजार आकाराला येत आहेत

आणखी जिल्हे वाढण्याची शक्यता

राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सुरू केलेले डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन दुसऱ्या टप्प्यात आणखी काही जिल्ह्यांचा समावेश केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि त्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी या ‘मिशन’द्वारे प्रयत्न केले जात आहेत. या मिशनचा कालावधी संपल्याने त्याला नव्याने मुदतवाढ देण्यात येईल, असे फडणवीस यांनी पुण्यात जाहीर केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com