PDKV Competitive Forum : शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारा डॉ. पंजाबराव देशमुख कॉम्पिटिटिव्ह फोरम

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आपल्या आयुष्यात सातत्याने शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला. शैक्षणिक संस्था निर्माण करून त्यांनी पुढील पिढ्या घडवण्यात मोठा हातभार लावला. त्यांच्या नावाने अकोल्यात असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आता नव्या पिढीला नोकरीच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम होत आहे.
PDKV Competitive Forum
PDKV Competitive Forum Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) यांनी आपल्या आयुष्यात सातत्याने शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला. शैक्षणिक संस्था निर्माण करून त्यांनी पुढील पिढ्या घडवण्यात मोठा हातभार लावला. त्यांच्या नावाने अकोल्यात असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (PDKV, Akola) आता नव्या पिढीला नोकरीच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम होत आहे.

PDKV Competitive Forum
Agri University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला प्रारंभ

या विद्यापीठात त्यांच्या नावे कार्यरत असलेल्या कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडोंसाठी स्पर्धा परीक्षेतून नोकरी तसेच उच्चशिक्षणाची दारे उघडी झाली आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली ही चळवळ कमालीची यशस्वी ठरते आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याचे काम कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून होत आहे.

PDKV Competitive Forum
Cultured Generation : संस्कारक्षम पिढ्यांतच देशाचे उज्ज्वल भविष्य

या शेतकऱ्यांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण तसेच इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी दुसरीकडे हा कॉम्पिटिटिव्ह फोरम काम करीत आहे. २००२ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्या पुढाकाराने या उपक्रमाची २४ सप्टेंबरला मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हा पहिले अध्यक्ष विजय भामरे व सरचिटणीस विजय सरोदे होते.

विद्यापीठात प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात सक्षमपणे सामोरे जाता यावे यासाठी हा फोरम काम करीत आहे. सध्या नोकरीसाठी विविध स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या क्लासेसचे पेव फुटले आहेत. मोठ्या रकमेची फी घेतली जाते. सर्वांना फी देणे परवडत नाही. अशांना नाममात्र मोबदल्यात योग्य वातावरण मिळवून दिले जात आहे. त्यामुळेच या कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांत सुमारे १४०० पेक्षा अधिक जणांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता आले.

PDKV Competitive Forum
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात  कडधान्य मूल्यवर्धन साखळी प्रकल्प 

कुणी यूपीएससी, एमपीएससी तर कुणी बँकिंग, कृषिविषयक परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले. या आधीच्या काळातही उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. या फोरमचे सदस्यत्व शुल्क अत्यल्प आहे. वर्षभरासाठी ६०० रुपये घेतले जातात. या बदल्यात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारी पुस्तके, इंटरनेट, विषय तज्ज्ञ, गेस्ट लेक्चरर, तज्ज्ञांसोबत संवाद, योग्य वातावरण, तसेच वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. विविध परीक्षांच्या काळात सराव पेपर घेतले जातात. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्यांमार्फत दुसऱ्यांच्या मुलाखतींचा सराव करून घेण्यात येतो. यामुळे इतरांना स्पर्धा परीक्षेला, मुलाखतीला कसे सामोरे जायचे, याबाबत प्रत्यक्ष यशस्वी झालेल्यांचे थेट मार्गदर्शन मिळते. या फोरममध्ये सरासरी सातशे ते आठशे विद्यार्थ्यी प्रवेश घेतात.

सर्व काही विद्यार्थीच !
या फोरमचे व्यवस्थापन करण्यासाठी ४० सदस्यांची समिती काम करते. वर्षभराचा त्यांचा कार्यकाळ राहतो. कृषीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या फोरमवर नेतृत्व करण्याची संधी मिळते. फोरमचे कामकाज चालवण्यासाठी विद्यार्थीच जबाबदाऱ्या आपापसांत वाटून घेतात. विद्यार्थी आणि विद्यापीठात समन्वयासाठी एक प्राध्यापक कार्यरत राहतात. सध्या विद्यापीठात शिकत असलेला सचिन मदान हा विद्यार्थी अध्यक्ष तर डॉ. जी. एस. जेऊघाले हे कार्यालयीन इन्चार्ज म्हणून काम करीत आहेत.

विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी हे कार्यालयीन इन्चार्ज विद्यार्थी व विद्यापीठादरम्यान समन्वयक म्हणून काम पाहतात. आजवर विद्यापीठाने या फोरमला सातत्याने पाठबळ दिले. विद्यमान कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी यापुढील काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. फोरममध्ये अभ्यास करून उच्चपदावर गेलेले उमेदवार नंतर उतराई म्हणून या ठिकाणी काही वस्तू, पुस्तके, टेबल-खुर्ची असे साहित्य देतात.

अशा सर्वांच्या सहकार्यातून हा फोरम दरवर्षी विस्तारत चालला आहे. ‘लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही...लढा माझा माझ्यासाठी...लढाईला माझ्या अंत नाही...’ या ओळींप्रमाणे विद्यार्थी स्वतःचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करीत आहेत.

प्रतिक्रिया...
या फोरमने अनेकांचे स्वप्न प्रत्यक्ष उतरविण्यासाठी दिशा, मार्गदर्शन केले. गरजवंत विद्यार्थ्यांना योग्य वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे.
- सचिन मदान, प्रेसिडेंट, पीडीसीएफ

विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न असतात. येत्या काळात आणखी सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न विद्यापीठ करीत आहे. ज्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्यांना योग्य वातावरण मिळेल.
-प्रा. डॉ. जी. एस. जेऊघाले, ऑफिस इन्चार्ज, पीडीसीएफ, अकोला

गेल्या दहा वर्षांतील यश
यूपीएससी ७
एआरएस-नेट-सेट १७४
ॲग्री एमपीएससी १२२
एमपीएससी ६१
बँक ६००
आयसीएआर- जेआरएफ १७०
जेआरए-एसआरए ५२


वर्षनिहाय यशस्वितांचा आलेख
वर्ष संख्या
२०१२ ११८
२०१३ ११३
२०१४ १६७
२०१५ १३२
२०१६ २१८
२०१७ १५६
२०१८ ८३
२०१९ १०९
२०२० १५७
२०२१ ८३
२०२२ १०८
एकूण १४४४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com