Rahibai Popere : राहीबाईंचा अवमान नाही ः डॉ. कल्पना पांडे यांचा दावा

राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये बीजमाता पोपेरे यांना आंमत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा येथे भेट देणाऱ्या वैज्ञानिक व विज्ञानाच्या अभ्यासकांना व्हावा हाच शुद्ध हेतू होता.
Rahibai Popere
Rahibai PopereAgrowon

नागपूर : राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये (Indian Science Congress) मला सन्मानजनक वागणूक मिळाली असून, मला माझे म्हणणे या व्यासपीठावरून मांडता आले. तरी माझा अवमान झाला वा मला बोलू दिले नाही हे वृत्त निराधार असल्याचे बीजमाता (Seed Mother) म्हणून ख्यातनाम असलेल्या राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांनी स्पष्ट केले आहे, असा दावा विज्ञान काँग्रेसच्या संयोजक डॉ. कल्पना पांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Rahibai Popere
Rahibai Popere : बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे भाषण रोखले

राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये बीजमाता पोपेरे यांना आंमत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा येथे भेट देणाऱ्या वैज्ञानिक व विज्ञानाच्या अभ्यासकांना व्हावा हाच शुद्ध हेतू होता.

Rahibai Popere
Rahibai Popere : राहीबाईंनी दिल्लीत मांडल्या ग्रामीण समस्या

त्यानुसार दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी महिला विज्ञान काँग्रेससह एकूण तीन आयोजनात सहभाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दरम्यान श्रीमती पोपेरे यांना भाषण देण्यापासून थांबवण्यात आले नव्हते.

असे सांगत श्रीमती डॉ. पांडे यांनी श्रीमती पोपेरे यांनी पाठविलेले निवेदन पत्रकारांना दाखविले. या वेळी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि शेतकरी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ. प्रकाश इटनकर उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com