Climate Change Conference : डॉ. सतीश करंडे यांची ‘युनो’च्या हवामान बदल परिषदेसाठी निवड

हवामान बदल या संकटाने जगभर आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. जगभर स्वीकारलेले आणि प्रचंड ऊर्जा आवश्यक असणारे आणि नैसर्गिक संसाधनावर ताण निर्माण करणारे विकास प्रारूप हे हवामान बदल या संकटाची तीव्रता वाढवत आहे. याविषयी चर्चा या परिषदेत होणार आहे.
Dr. Satish Karande
Dr. Satish KarandeAgrowon

सोलापूर ः शेटफळ (ता. मोहोळ) येथील डॉ. सतीश करंडे (Dr. Satish Karande) यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nation) (युनो) जागतिक हवामान बदल (Global Climate Change Conference) परिषदेसाठी(कॉन्फ्ररन्स ऑफ पार्टिज २७) निवड झाली आहे. ही परिषद सहा ते १८ नोव्हेंबर दरम्यान शर्म इल शेख, इजिप्त येथे होत आहे. जगभरातील १९२ देशातील तज्ज्ञ या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.

Dr. Satish Karande
climate change : वातावरण बदलाच्या संकटाचा विळखा

हवामान बदल या संकटाने जगभर आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. जगभर स्वीकारलेले आणि प्रचंड ऊर्जा आवश्यक असणारे आणि नैसर्गिक संसाधनावर ताण निर्माण करणारे विकास प्रारूप हे हवामान बदल या संकटाची तीव्रता वाढवत आहे. याविषयी चर्चा या परिषदेत होणार आहे.

Dr. Satish Karande
Climate Change : वातावरण बदलामुळे उष्णतेचा चटका तीव्र

त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने जगभरतील धोरण कर्ते, राज्यकर्ते, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, संशोधक, पत्रकार, लेखक यांना निमंत्रित केले आहे. डॉ. सतीश करंडे यांना लेखक-मुक्त पत्रकार या गटातून निमंत्रित केले आहे.

डॉ. करंडे यांचे हवामान बदल याविषयी २५ पेक्षा जास्त संशोधन पर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रकाशित झाले आहेत. जागतिक भात संशोधन संस्थेच्या सिंगापूर येथे पार पडलेल्या आंतर राष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांनी संशोधन सादर केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com