‘आविष्कार २०२२’ स्पर्धेत विभुते, कर्डीकरचे यश

डॉ. शरदचंद्रजी पवार महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश
winner
winnerAgrowon

माळेगाव :  शासकीय कृषी महाविद्यालय धुळे येथे विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन (संशोधन उत्सव) आविष्कार-२०२२ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेमध्ये  अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित डॉ. शरदचंद्रजी पवार एमबीए (कृषी) च्या विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.  

winner
College of Agriculture : बारामती कृषी महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश

यशस्वी विद्यार्थिनींमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विभागातून स्नेहल विभुते आणि कृषी आणि पशू संवर्धन विभागातून पायल कर्डीकर या विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे. या दोन्ही विद्यार्थिनींची राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दरम्यान, आविष्कार-२०२२ या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत ३५ कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये १७५ संशोधन प्रकल्प आले होते.

यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. आर. बी कळमकर, प्रा. आर. एम. बेलदार, डॉ. ए. डी. गोंडे, डॉ. राजकुमार, प्रा. एस. के. दळवे, प्रा. पी. जी. पाटील, प्रा. ए. एम. कुरे, प्रा. एस. सस्ते, प्रा. एस. डी शिंदे, प्रा. एस. पी. वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे, प्राचार्या जया तिवारी, उपप्राचार्य एस. पी. गायकवाड यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com