द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भारतीय जनता पक्ष आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी (ता. २४) राज्यसभा सचिवालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Presidential Election
Presidential ElectionAgrowon

नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्ष (BJP) आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार (Presidential Candidate) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी शुक्रवारी (ता. २४) राज्यसभा सचिवालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा येत्या सोमवारी (ता. २७) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संयुक्त जनता दल, बीजू जनता दल व वायएसआर काँग्रेसने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचे पारडे जड आहे. मुर्मू या देशाच्या १६ व्या, दुसऱ्या महिला व आदिवासी समाजातील पहिल्याच राष्ट्रपती (First Tribal President) ठरणार आहेत.

मुर्मू यांनी राज्यसभेचे महासचिव प्रमोदचंद्र मोदी यांच्याकडे अर्ज दाखल केला. या वेळी पंतप्रधान नरेद्र मोदी, मुर्मू यांच्या अर्जाचे पहिले प्रस्तावक व मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. याशिवाय भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, योगी आदित्यनाथ, मनोहरलाल खट्टर, प्रमोद सावंत, हेमंता बिस्वा शर्मा, पुष्कर धामी हे भाजपचे मुख्यमंत्री, संयुक्त जनता दल, बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस या समर्थक पक्षांचे प्रतिनिधीही हजर होते.

मुर्मू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याची माहिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com