देशातील काही भागांत दुष्काळी स्थिती

जुलै महिन्यात दक्षिण भारतात चांगला पाऊस झाला. तसेच मध्य भारतातही जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला. मात्र पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाचं प्रमाण कमी राहिलं.
Drought
DroughtAgrowon

पुणेः देशात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा १६.८ टक्के अधिक पाऊस (Rain) झाला. मात्र पावसाचं वितरण असमान (Uneven Distribution Of Rain) राहिलं. त्यामुळे अनेक भागांत पावसाचं प्रमाण कमी-जास्त राहिलं. काही ठिकाणी सरसरीपेक्षा अधिक तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला. त्यामुळे देशातील काही भागांत दुष्काळी स्थिती (Drought Condition In Some Region In The Country) निर्माण झाली आहे.

जुलै महिन्यात दक्षिण भारतात चांगला पाऊस झाला. तसेच मध्य भारतातही जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला. मात्र पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाचं प्रमाण कमी राहिलं. मात्र देशभरात पावसाचं प्रमाण असमान राहिल्याने खरीप हंगामाबाबत चिंता व्यक्त होत आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात पाऊस कमी राहिल्याने पिकांना फटका बसत आहे. तर व्यायव्य भारतात सरासरीपेक्षा १०.८ टक्के अधिक पाऊस झाला.

Drought
Bogus Fertilizer : बनावट लेबल लावलेल्या दाणेदार खताच्या ३०० गोण्या जप्त

जून महिन्यात देशभरात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा ८ टक्क्यांनी कमी होतं. मात्र जुलै महिन्यात ही तूट भरून निघाली. त्यामुळं जून आणि जुलै महिन्यांतील पावसाचं एकत्रित प्रमाण सरासरीपेक्षा ८ टक्क्यांनी अधिक झालं. मात्र पूर्व आणि ईशान्य भारतात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ४४.७ टक्क्यांनी कमी पाऊस झाला. पण या दोन्ही भागांत जून महिन्यात २२ टक्के अधिक पाऊस झाला होता. त्यामुळं दोन्ही महिन्यातील पावसाची तूट १६ टक्क्यांपर्यंत आहे.

Drought
Tur Sowing : खानदेशात तूर लागवड स्थिर

मध्य भारतात जून महिन्यात पावसाचं प्रमाण कमी होतं. मध्य भारतातील मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला होता. पण जुलै महिन्यात मात्र या राज्यांत सरासरीपेक्षा ४२.८ टक्के अधिक पाऊस झाला. दक्षिण भारतातही पावसाचं प्रमाण जुलै महिन्यात ६०.४ टक्क्यांनी अधिक होतं. मात्र जून महिन्यात या भागातही सरासरीपेक्षा १४ टक्के कमी पाऊस झाला होता.

म्हणजेच माॅन्सूनच्या दोन महिन्यात देशातील विविध भागांत पावसाचं प्रमाण कमी-जास्त राहिलं. जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या भागात जुलै महिन्यात कमी पाऊस झाला. तर जून महिन्यात कमी पाऊस झालेल्या भागात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. एकंदर पावसाच्या स्थितीचा परिणाम खरीप पिकांवर होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com