पावसाळ्याच्या तोंडावर टंचाईच्या झळा

मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील ७० गाव ३९ वाड्यांमधील ग्रामस्थांना आजघडीला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर टंचाईच्या झळा
WaterAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
औरंगाबाद : मराठवाड्यातील (Marathwada) सहा जिल्ह्यातील ७० गाव ३९ वाड्यांमधील ग्रामस्थांना आजघडीला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. पावसाळ्याच्या (Rain) तोंडावर जाणवत असलेल्या पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून ९३ टँकर सुरू करण्यात आले असून, ८५२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

तुलनेने यंदा पाणी टंचाईच्या झळा कमीच जाणवत असल्याची स्थिती आहे. परंतु दुसरीकडे मराठवाड्यातील विविध पाणीसाठ्यांमधील जवळपास ७० टक्क्यांपेक्षा जास्त काही महिन्यातच कमी झालेले पाणी चिंतेचा विषय आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व बीड या जिल्ह्यांमधील ७० गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील चार, जालन्यातील सर्वाधिक ३३, परभणीतील दोन, हिंगोलीतील १४, नांदेडमधील ११ व बीड मधील सहा गावांचा समावेश आहे. दुसरीकडे ३९ वाड्यावरील ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील एक, जालन्यातील सर्वाधिक २१, नांदेडमधील १३, बीडमधील ४ वाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाव वाड्यांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने ७९ खासगी व १४ शासकीय मिळून ९३ टॅंकरच्या साह्याने पाणी पुरवठा केला जातो आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पाच, जालना जिल्ह्यात सर्वाधिक ४३, परभणीमध्ये एक, हिंगोलीमध्ये २०, नांदेडमध्ये १६ तर बीडमध्ये आठ टॅंकरने टंचाईग्रस्त ग्रामस्थांना पाणी पुरवले जात आहे. आठही जिल्ह्यात ८५२ विहिरींचे टँकर व टॅंकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ९०, जालना ९३ , परभणी २९, हिंगोली सर्वाधिक २९४, नांदेड १६४ ,बीड १६१, लातूर १७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील अधिग्रहीत केलेल्या चार खासगी विहिरींचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पाच, जालना जिल्ह्यात सर्वाधिक ४३, परभणीमध्ये एक, हिंगोलीमध्ये २०, नांदेडमध्ये १६ तर बीडमध्ये आठ टॅंकरने टंचाईग्रस्त ग्रामस्थांना पाणी पुरवले जात आहे. आठही जिल्ह्यात ८५२ विहिरींचे टँकर व टॅंकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ९०, जालना ९३ , परभणी २९, हिंगोली सर्वाधिक २९४, नांदेड १६४ ,बीड १६१, लातूर १७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील अधिग्रहीत केलेल्या चार खासगी विहिरींचा समावेश आहे.

तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे
औरंगाबादमधील कन्नड व सोयगाव, जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा, घनसावंगी, परभणीमधील सेलू, हिंगोलीतील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, नांदेडमधील नांदेड, मुखेड, कंधार, माहूर तर बीडमधील पाटोदा, धारूर आदी तालुक्यातील गावांचा टंचाईग्रस्त गाव-वाड्यांमध्ये समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com