Drumstick Cultivation : अंगणातील देशी शेवग्याला बहर

विक्रमगडसह ग्रामीण भागात लागवड
Drumstick Cultivation
Drumstick CultivationAgrowon

विक्रमगड : डिसेंबर ते जानेवारी महिन्यात विक्रमगडसह तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरासमोर शेवग्याचे झाड शेगांनी बहरलेले दिसून येते. डिसेंबर ते जानेवारीमध्ये या देशी शेवग्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात शेंगा लगडलेल्या पाहायला मिळतात. या शेंगांमुळे गृहिणींना भाजीची चिंता मिटलेली असते.

Drumstick Cultivation
Drumstick Processing : शेवग्याच्या पानांपासून पावडर, चहा, रस

चविष्ट असलेल्या या शेवग्याच्या शेंगा या आरोग्यवर्धकदेखील असतात. त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाणसुद्धा जास्त असल्याने या शेंगा आरोग्याला चांगल्या असतात. डिसेंबर ते जानेवारी या थंडीच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागात अंगणात लावलेल्या शेवग्याला मोठ्या प्रमाणात शेंगा लगडतात. त्यामुळे या दोन महिन्यांत ग्रामीण भागात गृहिणींचे बजेट बसवण्यात या शेवग्याच्या शेंगांचा मोठा वाटा असतो.

रासायनिक खतांशिवाय सेंद्रिय भाजीपाला

वरणा, पावटा, घेवडा, पापडी, शेवगा या सर्व भाज्या हंगामी असतात. भाजीपाला हा नैसर्गिक असतो. कोणत्याही प्रकारची कीटकनाशके फवारणी, कोणतीही रासायनिक खते वापरली जात नसल्याचे त्याचा कोणताही दुष्परिणाम आरोग्यावर होत नाही. शेणखत, गांडूळ खत, राख टाकून हा भाजीपाला पिकवला जातो.

Drumstick Cultivation
Pulses Cultivation : माणगावमध्ये कडधान्याच्या शेतीला बहर

पानांची, फुलांचीही भाजी

शेवग्याच्या शेंगाच चवीने खाल्ल्या जात नाहीत; तर शेवग्याच्या कोवळ्या पानांची व फुलांचीही भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगा भाजीत किंवा आमटीत टाकण्याची पद्धत आहे. शिवाय शेवग्याची कोवळी पाने तोडून स्वच्छ केली जातात. ही पाने पाण्यामध्ये उकडून घेतली जातात. त्यानंतर पानातील पाणी पूर्णपणे काढून टाकून लसणाची फोडणी, शेगदाणे घालून याची भाजी केली जाते. फुलांचीसुद्धा भाजी करू शकतो.

घरासमोर व परसात असलेल्या शेवग्याच्या शेंगांमुळे आम्हाला दोन महिने खूप कमी प्रमाणात भाजीपाला विकत आणावा लागतो. त्यामुळे या दोन महिन्यांत आमचा भाजीपाल्यावरचा खर्च होणारा पैसा बऱ्यापैकी वाचतो. या शेंगा चविष्ट असल्याने आहारात सर्रास वापर केला जातो.

- जयश्री पाटील, गृहिणी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com