Chakan Forest : रसायन टाकल्याने चाकणच्या जंगलाची होतेय हानी

चाकण वन विभागाच्या हद्दीत चाकण-आळंदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वन विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कंपन्यांतील रसायन तसेच हॉटेलमधील, रुग्णालयातील कचरा टाकला जातो. कंपन्यांतील रसायनामुळे गवत तसेच जमीनही जळून जात आहे.
Chakan Forest
Chakan ForestAgrowon

चाकण, जि. पुणे ः चाकण वन विभागाच्या (Chakan Forest Department) हद्दीत चाकण-आळंदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वन विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कंपन्यांतील रसायन (Chemical) तसेच हॉटेलमधील, रुग्णालयातील कचरा टाकला जातो. कंपन्यांतील रसायनामुळे गवत तसेच जमीनही जळून जात आहे.

Chakan Forest
Agriculture Department : पणन संचालकपद ठरले औट घटकेचे

तसेच काही झाडेही जळून जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळी कंपन्यांतील रसायन रोटाईचे पुरातन तळे, कोचाळे तळे तसेच आळंदी घाटाच्या माथ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टाकले जाते. जमीन जळाल्याने त्यावर गवतही उगवत नाही, अशी भयानक अवस्था आहे. याचा फटका जंगलाला तसेच विविध पशुपक्ष्यांना बसत आहे.

Chakan Forest
Agriculture OPEC : ‘ओपेक’ समजून घेण्यात शेतकऱ्यांचे हित

चाकण (ता. खेड) येथे सुमारे एक हजार हेक्टरवर वन विभागाचे क्षेत्र असून, ते मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे, भोसे, केळगाव, चिंबळी, माजगाव या परिसरांत आहे. चाकण -आळंदी रस्त्यापासून काही अंतरावर औद्योगिक वसाहत आहे. या रस्त्याला खेटूनच काही कंपन्या आहेत.

औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांतील रसायन, रासायनिक प्रक्रिया केलेले सांडपाणी चाकण वनविभागाच्या हद्दीत बेकायदा सोडले जाते. हे रासायनिक सांडपाणी टँकरमधून रात्रीच्या वेळेस आणले जाते. या रसायन व कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरत असून, याचा विपरीत परिणाम पशुधनासह वन्यप्राण्यांना निर्माण झाला आहे.

जैवविविधता, वन्यजीव धोक्यात

चाकण वनविभागाच्या हद्दीत विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींसह जैवविविधता आहे. यामध्ये कोल्हे, रानडुकरे, रान मांजरे, मोर, विविध प्रकारचे विविध जातीचे साप, वनस्पतीवर जगणारे विविध प्रकारचे कीटक, अनेक जातीचे पशुपक्षी आहेत. कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी टाकल्यामुळे तसेच प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे जलस्रोतदेखील दूषित झाले आहेत. याचा वन्यजीवांना धोका निर्माण झालेला आहे, असे चाकण वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी सांगितले.

पशुधनाला धोका

चाकण वन विभागाच्या हद्दीत मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे, चिंबळी, केळगाव, माजगाव या भागांतील गाई, म्हशी, बैल, शेळ्या-मेंढ्या आदी पशुधन चारण्यासाठी घेऊन येतात. कचऱ्यातील प्लॅस्टिक तसेच दुर्गंधीयुक्त भाग, तारा, रसायन खाल्ल्याने या जनावरांना बाधा होऊ शकते. त्यामुळे परिसरातील काही गावांतील पशुधन मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com