ढगाळ वातावरणामुळे पाण्याची मागणी घटली

जिल्ह्यातील धरणांत ३०.३४ टीएमसी पाणीसाठा
ढगाळ वातावरणामुळे पाण्याची मागणी घटली
WaterAgrowon

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) उन्हाचा पारा कमी झाला आहे. यामुळे धरणातील पाण्याच्या मागणीत (Water Demand) काहीशी घट झाली आहे. मात्र उन्हाळ्यात उन्हाचा पारा (Temperature) वाढल्याने धरणातील पाण्याची मागणी वाढली होती. यामुळे पाणीसाठा (Water Stock) वेगाने कमी होण्यास सुरुवात झाला होता. सध्या जिल्ह्यातील २६ धरणांत ३०.३४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाण्याचे योग्य ते नियोजन मॉन्सून दाखल होईतोपर्यंत जलसंपदा विभागाला करावे लागेल.

जिल्ह्यात उजनीसह लहान मोठी एकूण २५ धरणे आहेत. यातील चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी एवढी आहे. या पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी- चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अति उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढली होती. सध्या जिल्ह्यातील धरणांत अत्यल्प पाणीसाठा आहे. चालू महिन्यात वेळेवर पाऊस न झाल्यास या धरणातील पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात असल्याने बरेचसे पाणी शिल्लक आहे.

सध्या डिंभे, घोड, चासकमान, वीर या धरणांतून पाण्याचा डाव्या कालव्यांना, तर खडकवासला, वीर, उजनी धरणांतून उजव्या कालव्यात विसर्ग सोडण्यात आला आहे. याचा वापर शेतीसाठी केला जात आहे. या शिवाय आंध्रा, खडकवासला धरणांतून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे.

धरणनिहाय उपलब्ध पाणीसाठा (टीएमसी)ः

माणिकडोह ०.७९, येडगाव ०.७२, वडज ०.१३, डिंभे ०.९३, घोड ०.१९, विसापूर ०.०१, चिल्हेवाडी ०.०५, कळमोडी ०.१३, चासकमान १.३१, भामाआसखेड २.६६, वडिवळे ०.११, आंध्रा १.८५, पवना २.१५, कासारसाई ०.१८, मुळशी १.०१, वरसगाव २.६६, पानशेत २.२९, खडकवासला ०.८५, गुंजवणी ०.९९, निरा देवधर २.२४, भाटघर ३.१०, वीर ५.११, उजनी ०.८८.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com