Heavy Rainfall : मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान

जिल्ह्यात सर्वत्र होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून, खरीप हंगाम हातातून जाण्याची परिस्थिती आहे.
Heavy Rainfall
Heavy RainfallAgrowon

नाशिक : जिल्ह्यात सर्वत्र होत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) पिकांचे नुकसान झाल्याची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून, खरीप हंगाम (Khareep season)हातातून जाण्याची परिस्थिती आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी ८ वाजेपर्यंत इगतपुरी, नाशिक, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, सटाणा, कळवण, मालेगाव, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर सटाणा तालुक्यांतील मुल्हेर परिसरात अतिवृष्टी झाली असून ७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दररोज होत असलेल्या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे.

Heavy Rainfall
Monsoon Update : मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबणार.

शिवारात पावसाचे पाणी साचून राहिल्याने अनेक ठिकाणी पिके सडू लागली आहेत. तर काही भागांत पिके आडवी होऊन नुकसान वाढत आहे. इगतपुरी, पेठ त्र्यंबकेश्वर सुरगाणा व नाशिक तालुक्यांच्या परिसरात जोरदार गोष्टी होत असल्याने भात सोयाबीन भाजीपाला या पिकांना मोठा तडाखा बसत आहे. सातत्याने पाणी शिवारात साचून राहिल्याने कंदवर्गीय भाजीपाला पिके सडू लागली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान फ्लॉवर व कोबी या पिकांचे आहे तर टोमॅटो पिके बुरशीजन्य रोगांच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळे हा पाऊस आता तरी थांबावा, असे शेतकऱ्यांमधून ऐकायला येते. सटाणा तालुक्यात मुल्हेर येथे अतिवृष्टी, तर जायखेडा, वीरगाव, बागलाण महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाला आहे.

इगतपुरी तालुक्यातील धारगाव, टाकेद, नांदगाव, वाडीवऱ्हे, घोटी व इगतपुरी परिसरांत जोरात पाऊस सुरूच होता. सुरगाणा तालुक्यातील मनखेड, बाऱ्हे, बोरगाव परिसरांत पावसाचा जोर दिसून आला. तर नाशिक तालुक्यात माडसांगवी, शिंदे, सातपूर, नाशिक, देवळाली परिसरांत जोर कायम होता. दिंडोरी तालुक्यातील सर्वच भागांत पाऊस झाला. त्यामध्ये उमराळे, ननाशी, दिंडोरी, कसबेवणी येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. चांदवड, नांदगाव, येवला व देवळा तालुक्यांत जोर कमी होता. मात्र दुपारनंतर अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर्व भागातही पश्चिम भागाप्रमाणे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

सुरू असलेला विसर्ग (ता.१७ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतची स्थिती)

दारणा ५९२४

मुकणे १,०८९

कडवा ५००१

वालदेवी ४०७

गंगापूर १,६०८

आळंदी ४४६

भोजापुर ९९०

पालखेड ६,३९३

नांदूरमधमेश्वर ३३,५७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com