Rain : धरणे भरली, चिंता मिटली

गेल्या अडीच महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली असून, २६ धरणांपैकी १० धरणे शंभर टक्के भरली आहेत.
Pune Rain
Pune RainAgrowon

पुणे : गेल्या अडीच महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water Storage) वेगाने वाढ झाली असून, २६ धरणांपैकी १० धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर उर्वरित धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा (Water Stock) झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून, उन्हाळ्यात पाणीटंचाईची (Water Scarity) समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.

Pune Rain
Ujani Dam : उजनी धरण अखेर शंभर टक्के भरले

हवामान विभागाने चालू वर्षी पहिल्या टप्प्यात ९९ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जून महिन्यात सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी ८३.१ मिलिमीटर म्हणजेच ४७ टक्के पाऊस पडला आहे. हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत कमी होते. तर जुलै महिन्यात सरासरीच्या ३०९.३ मिलिमीटरपैकी ४३७.५ मिलिमीटर म्हणजेच १४१ टक्के पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के अधिक पाऊस पडल्याची स्थिती आहे. ऑगस्टमध्येही सुरुवातीपासून चांगल्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक वेगाने वाढली आहे.

Pune Rain
Rain fed Agriculture : कोरडवाहू शेती विकासासाठी नवे धोरण

जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांत १९१.६६ टीएमसी म्हणजेच ९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण साखळीत एकूण २८.९२ टीएमसी म्हणजेच ९९.२० टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणांत शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे.

नीरा खोऱ्यातील धरणांत ४८.०१ टीएमसी म्हणजेच १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, भाटघर, वीर ही धरणे शंभर टक्के, तर पवना, कासारसाई, भामा आसखेड, नाझरे, गुंजवणी, नीरा देवघर या धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे या धरणांत ९० टक्क्यांहून अधिक, तर माणिकडोह, येडगाव, चिल्हेवाडी, घोड धरणांत ६० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. विसापूर धरणात ०.८१ टीएमसी म्हणजेच ८९ टक्के, तर उजनी धरणात ५४.७८ टीएमसी म्हणजेच १०० टक्के, मुळशी धरणात २०.१२ टीएमसी म्हणजेच ९९.८३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणे शहरासह शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍न सुटणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com