खानदेशात पेरण्या धोक्यात

पावसाने दिली हूल, शेतकऱ्यांना प्रतीक्षा
खानदेशात पेरण्या धोक्यात

जळगाव ः पावसाने हुल दिल्याने खानदेशातील सुमारे ६००० हेक्टरवरील पेरण्या धोक्यात (Sowing In Danger) आल्या आहेत. कमी पावसात (Low Rain) किंवा पहिल्याच पावसात अनेकांनी मका (Maize), कापसाची लागवड (Cotton Cultivation) केली. परंतु या पेरण्या वाया जातील, अशी स्थिती आहे.

हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आहे. हवामान खात्याने यंदा मॉन्सून लवकर दाखल होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, १५ जून येऊनही मॉन्सून तोंड दाखवायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी फसव्या अंदाजाने नुकसान झाल्याची स्थिती दिसत आहे. कारण अनेकांनी पेरण्या केल्या. परंतु पावसाअभावी त्या वाया जात आहेत. भडगाव तालुक्यातही साडेतीन हजार हेक्टरवर बागायती सुमारे सहा हजार हेक्टरवर मका व कोरडवाहू कापसाची लागवड झाली होती. अनेकांनी धूळ पेरणीदेखील केली होती. पाऊस कमी आला. काही भागात पाऊसच आलेला नाही. रोज सकाळी आठपासून ऊन पडत आहे. उष्णता वाढली आहे.

सकाळी काही वेळ ढगांची जमवाजमव होते. मुसळधार पाऊस होईल, असे वाटते. मात्र, पाऊस पडत नाही. अशीच स्थिती राहिल्यास पुढे पेरण्यांना उशीर होईल. पेरण्या जसजशा लांबणीवर पडतील, तसे विविध पिकांची पेरणीची मुदत संपेल. त्यात सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग आदी पिकांची पेरणी जूनअखेर अपेक्षित असते.

मॉन्सून वेळेत येईल, असा अंदाज व्यक्त झाला. मात्र, जून महिना निम्मा संपूनही मॉन्सूनचे आगमन खानदेशात झालेले नाही. काही भागात ६ ते १० जूनदरम्यान वादळी पाऊस झाला. त्यावर पेरण्या शेतकऱ्यांनी उरकल्या. पण त्यानंतर पाऊस न आल्याने त्या वाया गेल्याची स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर कोरडवाहू पिकांची पेरणी झाली होती. त्यात कापसाची लागवड अधिक होती. तसेच मक्याची लागवडही अनेकांनी केली होती. सोयाबीनची पेरणी मात्र अनेकांनी टाळली होती. यामुळे सोयाबीन पेरणी फारशी झाली नाही, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

पेरणी अशी अपेक्षित आहे...

जळगाव जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर, धुळ्यात सव्वाचार लाख हेक्टरवर आणि नंदुरबारात अडीच लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी खरिपात अपेक्षित आहे. यात जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे अखेरीस फक्त पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड यशस्वी झालेली दिसत आहे. सुमारे दीड लाख हेक्टरवर खानदेशात बागायती कापसाची लागवड यंदा झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com