पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

जिल्ह्यात एक ते १९ जून या एकोणीस दिवसांच्या कालावधीत अवघा ३४.४ मिलिमीटर पाऊस पडला. एक जून रोजी पावसाचा जोर अधिक असला, तरी दोन जूनपासून दांडी मारली होती.
पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Kharip SowingAgrowon

पुणेः जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला असूनही पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावलेली नाही. यामुळे बहुतांशी ठिकाणी पेरण्या (Kharip Sowing) खोळंबल्या आहेत. अशीच स्थिती राहिल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी दोन लाख ५ हजार १०८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी कृषी विभागाने खते, बियाणांचे नियोजन केले आहे. परंतु पाऊस नसल्याने खते, बियाणे पडून असल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात एक ते १९ जून या एकोणीस दिवसांच्या कालावधीत अवघा ३४.४ मिलिमीटर पाऊस पडला. एक जून रोजी पावसाचा जोर अधिक असला, तरी दोन जूनपासून दांडी मारली होती. एक जून रोजी ४.४ मिलिमीटर, तर दोन जून रोजी १.२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यानंतर तीन दिवस पाऊस पडला नाही. सहा जून रोजी ३.४ मिलिमीटर, तर सात आणि आठ जून रोजी पाऊस नव्हता. नऊ जून रोजी मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर ९.६ मिलिमीटर पाऊस पडला. तर दहा जून रोजी ३.५, अकरा जून रोजी ४.५, बारा जून रोजी २.८ तर १३ जून रोजी २.२, १४ जून रोजी १.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.

१५ ते १९ या कालावधीत जोरदार पाऊस नव्हता. झालेला पाऊस हा पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने भात रोपवाटिकेच्या कामांना सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्षात पूर्वेकडील तालुक्यात अजूनही दमदार पाऊस झालेल्या नाही. त्यामुळे पूर्वेकडील दौड, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती या तालुक्यांतही काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

भात रोपवाटिकेच्या कामांना सुरुवातः

पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव हे तालुके भाताचे तालुके म्हणून ओळखले जातात. या भागात गेल्या आठवड्यात ९ जूनच्या दरम्यान चांगला पाऊस पडला. यामुळे भात लागवडीला (Paddy Cultivation) चांगली सुरुवात झाली आहे. सध्या या भागातील भात व नाचणीचे रोपवाटिकेची कामे वेगाने आहेत. या भागात चांगला पावसाची गरज असून, चांगला पाऊस झाल्यास भात रोपवाटिकेची कामे वेळेवर होतील, अशी अपेक्षा आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने या भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. येत्या काळात पावसाचा जोर वाढल्यास एसआरटी पद्धतीने भात लागवडीला वेग येणार असल्याची शक्यता आहे.

पूर्वेकडील तालुक्यात पेरण्या खोळंबल्याः

जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्यात जून महिन्यात काही प्रमाणात हलक्या सरी बरसल्या होत्या. त्यामुळे गेल्या इंदापूर, बारामती भागात खरिपाच्या पेरण्यांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्याची स्थिती आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पूर्वेकडील शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड या तालुक्यांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, इंदापूरमध्ये तुरळक ठिकाणी बाजरी, तूर व सोयाबीन पिकांच्या तुरळक पेरण्या झाल्या आहेत. येत्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. अजूनही शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

खरीप हंगामात पेरणी होणारे अंदाजित क्षेत्र, हेक्टरमध्ये :

भात ६०१००, ज्वारी ३००, बाजरी ३७,७६०, रागी ३३००, मका २५०००, इतर खरीप तृणधान्ये १०९६, तूर १६००, मूग १३८००, उडीद १४००, इतर खरीप कडधान्ये ८,५०० भुईमूग १४,०००, तीळ १००, कारळा ३००, सूर्यफूल ३५०, सोयाबीन ३७५००, कापूस २५०

पावसाचा चांगला अंदाज असल्याने यंदा मी २२ ते २५ एकरांवर ऊस लागवड करणार आहे. त्यासाठी शेत तयार केले असून, ही सर्व लागवड ड्रीपवर करणार आहे. त्यापैकी पाच ते सहा एकरांवर लागवड झाली आहे. सध्या पाऊस नसल्याने पुढील लागवड करू की नको या चिंतेत आहे. त्यातच पावसाची अवस्थाही बिकट वाटते.

धनंजय आटोळे, प्रगतशील शेतकरी, राजेगाव, ता. दौंड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com