पोळ्यापूर्वीच पाऊस झाला भोळा

आला पोळा अन् पाऊस झाला भोळा, अशी म्हण शेतकऱ्यात रूढ आहे. परंतु यंदा पावसाळ्यापूर्वी प्रचंड पाऊस होऊन पोळा सणाच्या दहा-बारा दिवसांपासूनच पावसाने ओढ दिल्याने अतिवृष्टीतून शिल्लक राहिलेली खरिपातील पिके सुकू लागली आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नांदेड : आला पोळा (Bailpola) अन् पाऊस झाला भोळा, अशी म्हण शेतकऱ्यात रूढ आहे. परंतु यंदा पावसाळ्यापूर्वी प्रचंड पाऊस (Heavy Rain) होऊन पोळा सणाच्या दहा-बारा दिवसांपासूनच पावसाने ओढ दिल्याने अतिवृष्टीतून (Excessive Rain) शिल्लक राहिलेली खरिपातील पिके सुकू (Crop Damage) लागली आहेत. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याची सर्वाधीक आवश्यकता असताना पावसाअभावी उत्पादनात (crop Production) मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Crop Damage
Crop Damage : ऑगस्टमधील नुकसानीचे ४८ टक्के पंचनामे उरकले

जिल्ह्यात यंदा कधी नव्हे एवढा रेकॉर्डब्रेक पाऊस होऊन दाणादाण उडाली होती. जुलैमधील तुफान अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती व फळपिकांचे पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८५८.४० मिलीमीटरनुसार १४१.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात झाला. जुलैमध्ये एकाच महिन्यात तब्बल ६०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे नुकसानीचे प्रमाण अधिक झाले होते. सततच्या पावसाने जमिनीचा वरच थर कडक बनून भेगा पडत आहेत. यामुळे पिकांच्या मुळा तुटत आहेत.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीने शेतीसह पिकांची दैना

दरम्यान अतिवृष्टीनंतर काही भागातील पिकांची परिस्थिती सुधारत होती. सोयाबीनची काही प्रमाणात वाढ झाल्याने पिकाला शेंगा लागत होत्या. अशा महत्त्वाच्या वेळी पावसाने मागील दहा-बारा दिवसापासून ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणीच सोयाबीन, कपाशी, ज्वारी या सारखी पिके सुकत आहेत. येत्या एक-दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर सोयाबीनच्या पिकाला फटका बसून उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना ठिबक, तुषार तसेच मुक्त प्रवाहाच्या माध्यमातून पिकाला पाणी देत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

अतिवृष्टीतून शिल्लक राहिलेले सोयाबीन पावसाअभावी वाळत आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत पाऊस झाला तरच बरे आहे. अन्यथा, पिकाचे काही खरे नाही. -
आनंद सिरसाट, शेतकरी, उमरा ता. लोहा
सततच्या पावसानंतर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पिकांच्या संवेदनशील काळात पावसाने ओढ दिली तर उत्पादनात घट अपेक्षीत असते. यामुळे पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकरी संरक्षित पाण्याचा वापर करून पिकांना पाणी द्यावे.
रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com