पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या

पुणे विभागात अवघ्या दोन टक्के पेरण्या
पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या
Kharif SowingAgrowon

पुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही पावसाने (Rain) दमदार हजेरी लावलेली नाही. यामुळे पुणे विभागात खरीप पेरण्या खोळंबल्या (Kharif Sowing) आहेत. आत्तापर्यंत सरासरीच्या आठ लाख ६६ हजार ८१९ हेक्टरपैकी अवघ्या २६ हजार ६४४ हेक्टर म्हणजेच २ टक्के पेरण्या (Sowing) झाल्या आहेत. येत्या आठवड्यात पाऊस न झाल्यास पेरणीच्या क्षेत्रात घट (Decrease In Sowing Acreage) होऊन शेतकरी चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पूर्वमोसमी पाऊस झाला होता. विभागात आत्तापर्यंत नगरमध्ये ३९.६ मिलिमीटर, पुणे ३५.१ मिलिमीटर, तर सोलापूर येथे ४४.९ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात खरिपाची तयारी सुरू केली होती. अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेतनांगरणी व वखरणी करून ठेवले आहे. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीचे कामे थांबल्याची स्थिती आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव, तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते. त्यासाठी कृषी विभागाकडून बियाण्यांचा पुरवठा कृषी विभागाने केला आहे. भात लागवडीसाठी दर वर्षी मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका तयार होतात. यंदाही मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका होणार असल्याची शक्यता आहे. मात्र, जूनचे महिन्याचे वीस दिवस ओलांडले तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे शेतकरी पावसाची वाट पाहत असले तरी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय रोपवाटिकेची कामे हातात घ्यायला नको, अशा मनःस्थितीत शेतकरी आहेत. उर्वरित सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतील भात पट्ट्यातील तालुके वगळता शेतकऱ्यांनी चांगला पाऊस होईल, या अपेक्षेने खते, बियाण्यांची खरेदी सुरू केली असल्याचे दिसून येते. मात्र पावसाने जोरदार हजेरी न लावल्याने खते, बियाणे तसेच पडून असल्याचे चित्र आहे.

पुणे विभागात झालेली पेरणी, हेक्टरमध्ये

बाजरी ः ३४६५, मका ः २०७७, तूर ः ३०८२, मूग ः ४१६३, उडीद ः ३००३, भुईमूग ः १५५, सूर्यफूल ः ३०७, सोयाबीन ः २३५२, कापूस ः ८०४०

पुणे विभागातील खरिपाचे पीकनिहाय सरासरी, हेक्टरमध्ये ः

भात ः ८१,३९०, खरीप ज्वारी ः ७,४५०, बाजरी ः २,३६,२५०, रागी ः १३,६८०, मका ः ७८,४६०, इतर खरीप तृणधान्ये ः १८,३३०, तूर ः ३९,६३०, मूग ः १८,९६०, उडीद ः १६,१२०, इतर खरीप कडधान्ये ः ३१,२६०, भुईमूग ः ४७,८४०, तीळ ः२५८०, कारळे ः ६१८०, सूर्यफूल ः ९१९०, सोयाबीन ः ६८९३०, इतर तेलबिया ः ५८१०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com