झगडेवाडीत पाझर तलावाच्या दुरुस्तीअभावी पिकात घुसले पाणी

झगडेवाडी येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने फुटलेला पाझर तलाव प्रशासनाकडून अद्यापही दुरुस्त न करण्यात आल्याने पावसाच्या पाण्याने नुकसान होतच आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

इंदापूर, जि. पुणे ः झगडेवाडी येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने फुटलेला पाझर तलाव प्रशासनाकडून अद्यापही दुरुस्त न करण्यात आल्याने पावसाच्या पाण्याने नुकसान होतच आहे. आता नीरा डावा कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात आलेले पाणी थेट उभ्या पिकात घुसल्याने शेतकऱ्याचे नुकसान मोठे होत आहे. याबाबत प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पाझर तलावाची दुरुस्ती करावी. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांमधून होत आहे.

Crop Damage
Crop Damage : लाखांदूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील शेती गट नंबर १४२ लगत पाझर तलाव (Pond) आहे. हा तलाव मागील काही वर्षांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने (Untimely Rain) फुटला होता. त्या वेळीही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले होते. त्या वेळी ही संबंधित शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित होते. आता परत नीरा डावा कालव्यातून (Nira Left Canal)वडापुरी तलावासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याने पाझर तलाव दुरुस्त न केल्याने पुन्हा शेतकऱ्याच्या उभ्या मका पिकामध्ये पाणी शिरले आहे. गेल्या आठ दिवसांपासून पीक पाण्यात आहे.यामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन मोठे नुकसान होत आहे.

याबाबत बोलताना बाधित शेतकरी अंकुश झगडे म्हणाले, ‘‘नीरा डाव्या कालव्यातून वडापुरी तलावासाठी सोडण्यात येणारे पाणी हे अधिकृत पोटचारीच्या माध्यमातून न सोडता पाझर तलावाच्या माध्यमातून सोडले जात आहे. यामध्ये पूर्वी पाझर तलाव फुटल्याने सोडण्यात आलेले पाणी उभ्या पिकामध्ये घुसत आहे. तसेच विहिरीमध्येही गाळ साठत आहे. या बाबत अनेक वेळा तक्रारी केल्या मोठ्या आर्थिक नुकसान झाले मात्र तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com