Crop Damage : कपाशीची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडणार

जुलैपासून सुरू असलेली संततधार यामुळे यवतमाळ जिल्ह्यात कापसाची वाढ खुंटली आहे. याचा थेट परिणाम कापसाच्या उत्पादकतेवर होणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगतात.
Crop Damage
Crop DamageAgrowon

यवतमाळ : जून महिन्यात पावसाने दिलेला खंड आणि त्यानंतर जुलैपासून सुरू असलेली संततधार (Heavy Rain) यामुळे यवतमाळ जिल्ह्यात कापसाची वाढ खुंटली आहे. याचा थेट परिणाम कापसाच्या उत्पादकतेवर (Cotton Production) होणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगतात. हवामान खात्यासह विविध विभागांनी यंदा समाधानकारक पाऊसमान राहील,

Crop Damage
Crop Insurance : शेतकरी योजनांचा निम्मा पैसा जातो विमा कंपन्यांच्या खिशात

असे अंदाज वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी धूळ पेरणीवर भर दिला. पावसाने मात्र सारे अंदाज खोटे ठरवीत जून महिन्याच्या सुरुवातीलाच उघडीप दिली. सुरुवातीलाच पाण्याचा ताण सोसावा लागल्याने पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम झाला. काही शेतकऱ्यांना तर दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात इतकेच काय,

Crop Damage
Crop Damage : पाच जिल्ह्यांत पिकांवर संकटांची मालिका कायम

तर सप्टेंबर महिन्यातही पावसाची संततधार होती. अनेक शिवारांत पावसाचे पाणी साचून राहिल्याने त्याचाही वाढीला फटका बसला. आर्णी तालुक्‍यासह जिल्ह्याच्या अनेक भागांत कपाशीची वाढ अवघी हातभर झाली आहे. या कपाशीच्या झाडांना बोंड लागणार तरी किती, असा प्रश्‍न शेतकरी एकमेकांनाच विचारत आहेत. सततच्या पावसाने पाती आणि फुलांची देखील गळ झाली.

Crop Damage
Crop Damage : पीक नुकसानीची भरपाई देण्याबाबत अधिसूचना जारी

त्याचाही उत्पादकतेवर थेट परिणाम होणार आहे. कपाशीच्या झाडांची पोषक वाढ झाली तरच उत्पादकता आणि उत्पन्नाचे गणित जुळते, असा शेतकऱ्यांचा दर वर्षीचा अनुभव आहे. यंदा मात्र वाढ खुंटल्याने सारे गणितच बिघडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात खरिपाच्या एकूण ९ लाख हेक्‍टरपैकी पावणेपाच लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. यातील बहुतांश

क्षेत्र कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना दर वर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. यातून नैराश्‍य वाढत आत्महत्या होतात. यंदा पाऊस अधिक झाल्याने तणाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पाणी साचून राहिल्याने डवरे चालत नाही त्यामुळे तणनियंत्रणासाठी मजुरांची मदत घ्यावी लागते.

यातून उत्पादकता खर्च वाढतो. आता कपाशीची वाढ खुंटल्याने बोंड कमी लागतील परिणामी उत्पादकता आणि उत्पन्नाचे गणितही हुकणार आहे.

- सतीश देशमुख, शेतकरी, रा. येरमल, ता. आर्णी, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com