गिरणाच्या पुरामुळे विठेवाडीत विहीर खचली

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे दुसऱ्यांदा नुकसान झाले. गिरणा नदीला आलेल्या पुरात विठेवाडी शिवारातील नदीकाठच्या जमिनीवर असलेल्या विहिरी पूर पाण्यामुळे खचल्या.
Girna River Flood
Girna River FloodAgrowon

देवळा, जि. नाशिक : विठेवाडी (ता. देवळा) येथील रावसाहेब संपत निकम यांची विहीर गिरणा नदीला आलेल्या पुराच्या (Girna River Flood) पाण्यामुळे खचून व त्यावर बांधलेले सिमेंटचे कठडे विहरीत कोसळल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान (Farmer Loss) झाले. महसूल विभागाने पंचनामा केला असला तरी याबाबत अद्याप कोणतीही भरपाई मिळाली नसल्याने संबंधित शेतकरी कुटुंब हवालदिल आहे. नुकसानभरपाई (Farmer Compensation) मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Girna River Flood
गिरणा नदीवरील पूल कम बंधाऱ्यासाठी ४० कोटी निधी

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे दुसऱ्यांदा नुकसान झाले. गिरणा नदीला आलेल्या पुरात विठेवाडी शिवारातील नदीकाठच्या जमिनीवर असलेल्या विहिरी पूर पाण्यामुळे खचल्या. काही विहिरी बुडाल्या, तर काही आरसीसी बांधकाम केलेल्या विहिरींचे सिमेंटचे कठडे तुटून त्या खचल्या. मुसळधार पावसाने विठेवाडी शिवारातील निकम यांच्या शेतात पूरपाणी घुसून संपूर्ण विहीर खचली. ७० ते ७५ फूट खोल असलेली आणि बांधलेली संपूर्ण विहीर तुटून दबली गेली. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले; परंतु शासनाने अद्याप भरपाई दिलेली नाही. महसूल विभागाने तत्काळ वरिष्ठ पातळीवर पाहणी करावी व नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

Girna River Flood
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई कधी

मागील जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आले. गिरणा नदीला आलेल्या पुरात नदीकाठावरील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसून त्याचा फटका उभ्या पिकांना बसला, तसेच नदीकाठावरील विहिरींचे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामे केले; परंतु अद्याप एक रुपयाही भरपाई मिळाली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा नदीच्या काठावरील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे शेतीचे, उभ्या पिकांचे, तसेच विहिरींचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामेही केले; परंतु अद्याप भरपाई दिली नाही. ती तत्काळ देण्यात यावी.

-कुबेर जाधव, समन्वयक-स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com