Market committe : खेडा’मुळे बाजार समिती पडताहेत ओस

कळंब बाजार समिती अलर्ट मोडवर
Market committe
Market committeAgrowon

कळंब, जि.उस्मानाबाद : बहुतांश शेतकरी खेडा खरेदी (Kheda Kharedi) किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्याबाहेर (APMC) व्यापाऱ्यांना आपला शेतमाल (Agriculture Produce) विकतात. ख़या व्यवहाराची कुठलीच पावती दिली जात नाही. परिणामी, अशा व्यवहारामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक राहते. अशी फसवणूक तालुक्यातील इटकुर येथील एका व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून हरभरा खरेदी केला. यात २० ते २५ शेतकऱ्यांना सुमारे ६० लाख रुपयांना टोपी घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

खेडा खरेदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समितीने धाडसत्र सुरू केले असून गूरवार (ता. ३) तालुक्यातील खामसवाडी येथील खेडा खरेदी सुरू असलेल्या दुकानावर धाड मारून अभिलेख तपासणी करण्यात आली आहे.सध्या सोयाबीनचे दर वाढू लागले आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसापूर्वी ५६०० रुपये प्रतिक्विंटल सोयाबीनला दर मिळाला आहे.

तालुक्यातील बहुतांश गावात सोयाबीनच्या खेडा खरेदीला उत आला आहे. विनापरवाना खेडा खरेदीदार शेतकऱ्यांच्या दारावर पोहचून तसेच दुकाने थाटून शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी करून लूट करीत आहेत.शेतमाल खरेदी अत्यंत कमी झाल्यामुळे बाजार समितीची चिंता वाढली आहे. त्यामुळे त्याची दखल घेत खेडा खरेदीदार विरोधात धडक कारवाईचा निर्णय समिती प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Market committe
co-operative milk unions : सहकारी दूध संघांतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

खामसवाडी दुकानावर धाड खेडा खरेदीदारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राप्त तक्रारीनुसार खामसवाडी येथील किसन माळी,गणेश शेळके,दिनकर शेळके,रामचंद्र शेळके यांच्या दुकानावर बाजार समिती प्रशासन धाड मारली.दुकानदाराकडे बाजार समितीचा परवाना दिसून आला पण बाजार समितीच्या साक्षांकित पवतीबुक आढळून आले नाही.त्यामुळे नोटीस देवून खुलासा मागविण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com