Compost Manure Rate : खानदेशात शेणखताच्या मागणीत वाढ

Organic Compost : पंधराशेचा दर; सुपीकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न
 Manures
ManuresAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Farm Manures : तळोदा, जि. नंदुरबार : शेती उत्पादनात (Farm Production) वाढ होण्यासाठी बाजारात विविध प्रकारची रासायनिक खते (Chemical Fertilizer) मोठ्या प्रमाणात उपलब्ध असली तरी अद्यापही असंख्य शेतकरी आपल्या शेतात शेणखत टाकण्यास प्राधान्य देत आहेत.

त्यामुळे सातपुड्याच्या पायथा परिसरातील शेणखताला विशेष मागणी असून नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातही शेणखत खरेदी करून नेण्यात येत आहे.

रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत घसरत असते, त्यामुळे जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेणखताच्या वापराकडे वळले आहे.

त्यामुळे शेणखताला चांगलाच भाव मिळत असून सातपुडा पायथा परिसरात मुबलक प्रमाणात शेणखत उपलब्ध होत असल्याने नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातून शेणखताला चांगली मागणी होत आहे.

 Manures
Milk Production : दूध उत्पादनात घट; मागणीत ७ टक्क्यांनी वाढ

दररोज मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर, ट्रक यासारखे वाहने येत असून त्यांच्याकडून शेणखत खरेदी करून ट्रॅक्टर, ट्रक मध्ये भरून वाहून नेले जात आहे.

दरम्यान शेणखतामध्ये नत्र, स्फुरद, पलाश असते. तसेच सेंद्रिय कर्ब हा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो.

तसेच, मातीतील जैविक घटकांच्या वाढीसाठी चांगले कोरलेले शेणखत फायदेशीर राहत असल्याचे शेतकऱ्यांकडून शेणखताची मागणी वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.

 Manures
Bajara Demand : तृणधान्याच्या जनजागृतीमुळे बाजरीच्या मागणीत वाढ

तीन हजारांपर्यंतचा खर्च...
दरम्यान यांत्रिकीकरणामुळे पशुधनाची संख्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात घटली आहे. मात्र सातपुडा पायथा परिसरात अद्यापही पशुधनाचे संगोपन अल्पभूधारक शेतकरी करीत आहे.

त्यामुळे सातपुड्याच्या ग्रीन बेल्ट असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर शेळ्या, गाई असून त्याचबरोबर परिसरात तबेलेही मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यामुळे या परिसरात शेणखत बऱ्यापैकी उपलब्ध होत असून परिसरातील शेणखत १२०० ते १५०० रुपये ट्रॉली या दराने विकण्यात येत आहे.

शेणखत भरण्यासाठी मजुर तसेच, ट्रॅक्टरचे भाडे हे सर्व धरून अडीच ते तीन हजारात एक ट्रॉलीसाठी खर्च होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com