Dwarkadhish Sugar Factory : द्वारकाधीश कारखाना देणार २५०० रुपयांचा पहिला हप्ता

अध्यक्ष शंकरराव सावंत : २३ व्या गळीत हंगामाची सुरुवात
   Dwarkadhish Sugar Factory
  Dwarkadhish Sugar FactoryAgrowon

अंतापूर, ता. सटाणा : ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून द्वारकाधीश कारखाना (Dwarkadhish Sugar Factory) काम करीत आहे. लागवडीखालील क्षेत्र वाढवून उपयोग नसून प्रतिएकरी ऊस उत्पादन (Sugarcane Production) वाढवून किफायतशीर परतावा मिळण्यासाठी कारखाना प्रयत्नशील आहे. यंदा गळितास येणाऱ्या उसास २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्यात येईल, असे आश्‍वासन अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिले.

   Dwarkadhish Sugar Factory
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला द्या 

शेवरे (ता. सटाणा) येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या २३ व्या गळीत हंगामप्रसंगी ऊस उत्पादकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी आलेल्या शेतकऱ्यांना व्हीएसआय १८१२१ या ऊस लागवडीचे, पहिला, दुसरा, तिसरा खोडवा जातीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ऊस विकास अधिकारी बाळासाहेब करपे यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.

अध्यक्ष सावंत, उपाध्यक्षा चंद्रकला सावंत, नरेंद्र पाटील, डॉ. वर्षा पाटील, संचालक कैलास सावंत, सचिन सावंत यांच्या हस्ते द्वारकाधीश मंदिरात पूजन करून शेतकी अधिकारी विजय पगार, वैशाली पगार, सुदाम पगारे यांच्या हस्ते बैलगाडी व ऊस ट्रकचे पूजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव यांनी प्रास्ताविक करून यंदाच्या मानाचे ऊस उत्पादक केदा काकुळते, महेश दीक्षित, अमर देसले, रमेश गावित, बापू अहिरे यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाणपूजन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com