
यवतमाळ : पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी (Pradhan Mantri Kisan Samman Yojana) ई-केवायसी (E-KYC) आवश्यक आहे. अजूनही ७३ हजार ३८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही.
शिवाय ४० हजार शेतकऱ्यांचे बँक खाते (Bank Account) आधारशी लिंक झालेले नाही. त्यामुळे जवळपास ४० हजार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान (PM Kisan) योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अनुदान केंद्र शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत सुरू करण्यात आले आहेत. तीन टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.
जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून सुरूवातीला मदत मिळाली होती. त्यानंतर केंद्र शासनाने आयकर भरणारे शेतकरी, नोकरदार यांना योजनेतून वगळले.
किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. आधार, बँक खाते लिंक असेल तर इ-केवायसी करणे बंधनकारक आहे.
मात्र, जिल्ह्यात ४० हजार ७०३ शेतकऱ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी अद्याप लिंक झालेले नाहीत. शिवाय ७३ हजार ३८१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही.
याशिवाय, ३० हजार शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती भूमी अभिलेख कार्यालयात आलेली नाही. परिणामी, मार्च महिन्यात येणाऱ्या हप्त्यातून अनेक शेतकरी वंचित राहण्याचा धोका आहे. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विभाग व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.