PM Kisan : एक लाख ६८ शेतकऱ्यांची ई-केवायसी सांगलीत अपूर्ण

केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार ७१० शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे.
PM Kisan Yojna News
PM Kisan Yojna NewsAgrowon

सांगली ः केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार ७१० शेतकऱ्यांनी ई-केवायसी (PM Kisan e-KYC) पूर्ण केली आहे. अजूनही १ लाख ६८ हजार ९०५ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नसून त्या शेतकऱ्यांनी बुधवारपर्यंत (ता. ७) ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

PM Kisan Yojna News
PM Kisan : शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी

जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ४ लाख ३६ हजार ६१५ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी २ लाख ६७ हजार ७१० शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे वर्षासाठी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे एकूण वार्षिक ६ हजार रुपये

PM Kisan Yojna News
PM Kisan : ‘शेतकरी सन्मान’चे राज्यात १ कोटी १० लाख लाभार्थी

शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहेत. हे हप्ते पुढे सुरू ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण असे महत्त्वाचे आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जून महिन्यापासून विशेष जगजागृती सुरू केली आहे. परंतु अद्याप ही विशेष जनजागृतीचा तितका प्रभाव गावा-गावात दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याकडे कल फारसा दिसत नाही. जिल्हा प्रशासन ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सातत्याने पुढाकर घेत असून ई-केवायसीची अंतिम मुदत ७ सप्टेंबर आहे. त्यामुळे योजनेत पात्र ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नाही, त्यांनी तत्काळ ई-केवायसी पूर्ण करावी.

तालुकानिहाय पंतप्रधान किसान सन्मान योजना दृष्टिक्षेप

तालुका लाभार्थी संख्या ई-केवायसी पूर्ण ई-केवायसी प्रलंबित

आटपाडी ३१,९३४ १७,७६४ १४,१७०

जत ७३,६६२ ४८,५१९ २५,१४३

कडेगाव ३६,९१९ २२,८५९ १४,०६०

कवठे महांकाळ ३०,५६२ १८,१६५ १२,३९७

खानापूर २७,१३५ १३,९०९ १३,२२६

मिरज ५७,८९६ ३२,८९७ २४,९९९

पलुस २५,६७२ १५,६६५ १०,००७

शिराळा ३७,९१९ २५,५३३ १२,३८६

तासगाव ४४,४६१ २७३७१ १७,०९०

वाळवा ७०,४५५ ४५,०२८ २५,४२७

एकूण ४,३६, ६१५ २,६७,७१० १,६८,९०५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com