
पुणे ः भ्रमणध्वनीतील उपयोजनाद्वारे (मोबाईल अॅप) ई-पीकपाहणीची (E Peek Pahani) अंतिम मुदत येत्या १५ ऑक्टोबरला समाप्त होत आहे. ‘अॅप’ची (App Version) नवी आवृत्ती राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी स्वतःहून ५३ लाख हेक्टरची ई-पीक पाहणी (E Peek Pahani Registration) पूर्ण केली आहे.
ई-पीकपाहणी प्रकल्पाचे राज्यस्तरीय समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागातील यंत्रणेने ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहे. गेल्या खरिपात एक कोटी हेक्टरपर्यंत नोंदणी झाली होती. मात्र त्या वेळी सुरुवातीपासून तलाठीदेखील या उपक्रमात सहभागी झाले होते.
यंदा पहिल्या टप्प्यात फक्त शेतकऱ्यांना हा अधिकार देण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात तलाठीदेखील या उपक्रमात येताच नोंदणी एक कोटीच्या पुढे जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणारा माझा पीकपेरा,’ अशी संकल्पना राज्य शासनाने आणल्यानंतर महसूल विभागाची सेवा काही प्रमाणात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरते आहे.
पूर्वी पीकपेरा नोंदविण्याचा अधिकार केवळ तलाठ्याला होता. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. मात्र ई-पीकपाहणीचे अधिकार थेट शेतकऱ्यांच्या हाती दिल्याने आता राज्यभर ३७३ पेक्षा जास्त पिकांची नोंद होऊ लागली आहे.
“शेतकरी उत्तम पद्धतीने ई-पीकपाहणी करीत आहेत. त्यातून राज्याचा पीक आकृतिबंध (क्रॉप पॅटर्न) अधिकृतपणे व जलदपणे हाती येतो आहे. त्यामुळे कृषी योजनांच्या नियोजनाला तसेच हमीभाव धान्य खरेदी योजनेचे नियोजन अधिक सुलभ होईल. गेल्या आठवड्यापर्यंत ३९ लाख खातेदार शेतकऱ्यांनी ५३ लाख ३९ हजार हेक्टरवरील पीक पाहणी पूर्ण केली आहे,” असे महसूल विभागातून सांगण्यात आले.
३ ऑक्टोबरअखेर ई-पीकपाहणी केलेली पहिली पाच मोठी पिके
सोयाबीन....२२.१६ लाख हेक्टर
कापूस...८.७३ लाख हेक्टर
तूर...१.९२ लाख हेक्टर
मका...१.८३ लाख हेक्टर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.