Earthquake : कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के

कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्रात शनिवारी (ता. ९) पहाटे साडेसहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.
Earthquake
EarthquakeAgrowon

पुणे : कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्रात शनिवारी (ता. ९) पहाटे साडेसहाच्या सुमारास भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. कर्नाटक राज्यातील विजयपुरा येथे भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपामुळे काही ठिकाणी घरांना तडे गेले. भूकंपाच्या हादऱ्याने जमीन थरथरल्याने एकच घबराट उडाली.

Earthquake
साध्या पेरणी यंत्राने बीबीएफ पेरणी करता येते?

विजयपुरा येथे झालेल्या भूकंपाचे केंद्र १७.०५ उत्तर अक्षांश व ७५.६५ पूर्व रेखांशादरम्यान होते. सकाळी ६ वाजून २२ मिनिटे ३ सेकंदांनी ४.६ रिस्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप झाला. जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर केंद्र असल्याने अधिक प्रभाव जाणवला. भूकंपाचे केंद्र पुण्यापासून २५० किलोमीटर, तर कोल्हापूरपासून १५४ किलोमीटर लांब अंतरावर होते.

शिरहट्टी (ता. अथणी) येथे शनिवारी (ता. ९) सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान भूकंपाचे तीन धक्के बसले. त्यामुळे गावातील महावीरनगर येथील ११ घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. भूकंपामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोलापूर, कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातही या भूकंपाचे धक्के जाणवले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com