Prof. Abhijit Sen: अर्थतज्ज्ञ अभिजित सेन कालवश

प्रा. सेन कृषी मूल्य व किंमत आयोगाचेही अध्यक्ष होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात (२००४ ते २०१४) त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य (Planning Commission) म्हणून काम केले.
Prof. Abhijit Sen
Prof. Abhijit SenAgrowon

ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, नियोजन आयोगाचे माजी सदस्य प्रा. अभिजित सेन (Prof. Abhijit Sen) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे देशातील प्रमुख जाणकार म्हणून प्रा. सेन यांची ख्याती होती.

प्रा. सेन यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत इंग्लंडमधील ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठ, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्यापनासह विविध सरकारी पदांवर काम केले. प्रा. सेन कृषी मूल्य व किंमत आयोगाचेही अध्यक्ष होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात (२००४ ते २०१४) त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य (Planning Commission) म्हणून काम केले.

Prof. Abhijit Sen
दुधाच्या विक्रीदरात आणखी वाढ नाहीः क्रिसिल

वायदेबाजाराचा शेतमालाच्या किंमतीवर परिणाम होतो का, याचा अभ्यास करण्यासाठी प्रा. सेन यांच्या अध्यक्षतेखाली २००७ मध्ये समिती नेमण्यात आली होती. प्रा. सेन यांनी फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (FAO), इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट (IFAD), युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP), एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम केले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारने २०१४ मध्ये दीर्घकालीन धान्य धोरण विकसित करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी प्रा. सेन यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते गहू आणि तांदळाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे (PDS) जोरदार समर्थक होते. अन्न अनुदानाचा खर्च पेलण्याइतकी देशाची आर्थिक ताकद आहे, असे त्यांचे मत होते. अन्न सुरक्षेबरोबरच शेतकर्‍यांच्या उत्पादनाला वाजवी किंमत मिळावी, यासाठी ते आग्रही होते. ग्रामीण अर्थकारणाचा गाढा अभ्यास असलेल्या प्रा. सेन यांना २०१० साली पदमभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आले.

Prof. Abhijit Sen
Kisan Andolan: केंद्र सरकारविरोधात आणखी तीव्रतेने आंदोलन करणार

प्रा. सेन यांचा जन्म नवी दिल्लीतील बंगाली कुटुंबात झाला. सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून त्यांनी भौतिकशास्त्र ऑनर्स पदवी घेतली. त्यांनी १९८१ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. पूर्ण केली. त्यांचे वडील समर सेन हेसुद्धा जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. प्रा. अभिजित सेन यांच्या पाठीमागे पत्नी अर्थतज्ज्ञ जयंती घोष आणि मुलगी जान्हवी असा परिवार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com