Patra Chawl Case:राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ; ८ ऑगस्टपर्यंत मुक्काम वाढला

न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांचा पुढील ४ दिवसांचा मुक्कामही ईडीच्या कोठडीत असणार आहे.
Sanjay Raut
Sanjay RautAgrowon

मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांचा पुढील ४ दिवसांचा मुक्कामही ईडीच्या कोठडीत असणार आहे.

दरम्यान, पत्राचाळीतील घोटाळ्याच्या (Patra Chawl Case) आरोपाप्रकरणी त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्यांनी तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊतांच्या चौकशीसाठी अधिक वेळ मागत ईडीने कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

Sanjay Raut
Election Commission: निकाल येईपर्यंत पक्षचिन्हाबाबत निर्णय न घेण्याचे आदेश

सुनावणीदरम्यान न्यायालयाने राऊतांकडे (Sanjay Raut) तुम्हाला काही त्रास आहे का? अशी विचारणा केली. यावर संजय राऊत यांनी न्यायालयात ,मला ठेवलंय तिथं हवा खेळती नाही. हृदयविकाराचा त्रास असल्यानं आपल्याला श्वसनाचा त्रास होतो आहे. याबाबत आपण ईडीच्या अधिकाऱ्यांनाही कल्पना दिली असल्याचे सांगितले.

यानंतर न्यायालयाने याची गंभीर दखल घेत ईडीच्या वकिलांना विचारलं की, जर त्यांना त्रास होतो आहे तर त्यांना अशा ठिकाणी का ठेवलं आहे? यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना एसी रुममध्ये ठेवले असल्याचे सांगितले. त्यावर राऊत यांनी, मला ज्या खोलीत ठेवलंय तिथं एसी असल्याचं मी पाहिलेलं नाही पण तिथं एक पंखा आहे आणि मला तिथं त्रास होत असल्याचे नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com