Wheat Production : बदलत्या हवामानाचा गव्हावर परिणाम

शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी परिसरात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही आले नव्हते.
Wheat Production
Wheat ProductionAgrowon

शहरटाकळी, ता. शेवगाव : कधी ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तर कधी कडक ऊन, कधी धुके तर कधी थंडी (clod) या वातावरणातील सततच्या बदल्यामुळे पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. अनेक पिकांवर रोग पडला असून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना औषधांची फवारणी करावी लागत आहे.

शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी परिसरात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके घेतली आहेत.

दमदार पावसामुळे सिंचन प्रकल्पासह नदी, नाले, विहिरी, लघू सिंचन तलाव ओसंडून वाहिले. त्यामुळे पाणी पातळी चांगल्या प्रमाणात वाढली.

या पाण्यावर रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकरी सरसावले. रब्बीतील गहू, हरभरा आदी पिके घेण्यात आलेली आहेत.

बियाणे, खते, पाण्याच्या पाळ्या देऊन रब्बीची पिके चांगली जोमात आणली. मात्र वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकावर विशेषतः हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर, गहू पीक पिवळे पडत आहे.

Wheat Production
Wheat Crop : खानदेशात गहू पीक जोमात

दरम्यान, यावर उपाय म्हणून पिकावर कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी शेतकरी करीत आहेत. काही प्रमाणात मर रोगावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे.

ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके यामुळे गहू, हरभरा पिवळा पडत आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. हरभऱ्यावर आळीही पडली आहे. रोगराई रोखण्यासाठी औषधी फवारणी, कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. मात्र रोगराई कमी होत नसल्याने पुन्हा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
संदीप खरड, शेतकरी, देवटाकळी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com