
नगर ः ‘‘शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाण्याच्या ताळेबंदाबरोबरच मातीचे व्यवस्थापन व्यवस्थित केले नाही, तर आपण कितीही विकासाचे गोडवे गायले तरीदेखील आपले प्रश्न सुटणार नाहीत. विद्यापीठाचा पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प हा देशाला दिशादर्शक ठरणार आहे, जमिनीतील सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) वाढविण्यासाठी प्रयत्न, ठरावीक पिकांचे उत्पादन घेऊन जमिनीला विश्रांती द्यायला हवी. जमिनीतील सूक्ष्म जिवांचे प्रमाण वाढविण्याबरोबरच मातीची धूप कमी करणे, पाणी व्यवस्थापन करणे यांसारखे उपाय योजून जमिनीचे आरोग्य (Soil Health) सुधारता येते,’’ असे मत आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात जागतिक मृदादिन व राज्यस्तरीय बीजप्रक्रिया स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा झाला. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे, नगरचे कृषी सहसंचालक रवींद्र माने, राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, यांच्यासह पदाधिकारी, कृषी विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.