Nashik News : कान्होळी धरणावर मेळवण धरणाच्या निर्मितीसाठी प्रयत्न

शेतकऱ्यांची जुनी मागणी असून, या सर्वेही करण्यात आला आहे. भुसे यांनी दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी आरसीसी प्लग बंधारा बांधला आहे.
Minister Dada bhuse Nashik News
Minister Dada bhuse Nashik NewsAgrowon

Nashik News : माळमाथ्यावरील शिवारातून वाहणाऱ्या कान्होळी नदीवर मेळवण धरणाची निर्मिती करून येथील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून माळमाथा परिसरातील अवर्षणग्रस्त (Drought) असलेले झोडगे, गुगूळवाड, भिलकोट, पळसदारे, पाडळदे आदी शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होत नसल्याने पावसाच्या भरोसाची हंगामी शेती क

या पार्श्‍वभूमीवर माळमाथ्यावरील कान्होळी नदीवर मेळवण धरण बांधण्यात यावा यासाठी मेळवण धरण संघर्ष समितीचे समन्वयक आर. डी. निकम यांनी केली आहे.

या मागणीसाठी परिसरातील शेतकरी शनिवारी (ता. ४) झोडगे येथून पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्यासाठी पायी दिंडीचे आयोजन करण्याचे जाहीर केले होते.

मात्र शुक्रवारी (ता. ३) पालकमंत्री भुसे यांनी नियोजित प्रकल्प परिसरात भेट देऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधल्याने पायी दिंडीचे आयोजन स्थगित करण्याची घोषणा निकम यांनी केली.

Minister Dada bhuse Nashik News
Agriculture Irrigation : पालखेड धरण-कालव्याला मिळणार झळाळी

शेतकऱ्यांची जुनी मागणी असून, या सर्वेही करण्यात आला आहे. भुसे यांनी दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी आरसीसी प्लग बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्याची ७० ते ८० फुटांपर्यंत उंची वाढविण्यात यावी अशी मागणी निकम यांनी केली आहे.

माळमाथा परिसरातील शिवारासाठी वरदान ठरणाऱ्या कान्होळी नदीवरील मेळवण प्रकल्प निर्मिती कामाच्या पाहणी भुसे यांनी करतेवेळी जलसंधारण, वन, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांना या कामाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

या वेळी वनअधिकारी हिरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, जलसंधारण विभागाच्या उपअभियंता श्रीमती वाघमारे, तहसीलदार पवार आदी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान भुसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती सुनील देवरे, झोडगे माजी सरपंच पंडित देसले, शरद देसले, परेश सोनजे, सुरेश देसले, सुनील देसले, बाळासाहेब देसाई, प्रकाश काळगुडे, ग्रामविकास अधिकारी आर. डी. ध्यानधान, तलाठी कदम, गुगळवाड सरपंच नीलम महाले, पळासदरे येथील राजेंद्र येवले, मालेगाव ग्राहक संघाचे उपसभापती विश्‍वनाथ निकम, माजी सरपंच सुनील निकम, प्रकाश चव्हाण, लुभान निकम, राजेश निकम, प्रल्हाद निकम, बळीराम चव्हाण, कैलास निकम, प्रदीप देसले आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Minister Dada bhuse Nashik News
Janbrung Dam : जांबरुंग धरण कागदावरच

तीनशे हेक्टर शेतजमीन येणार ओलिताखाली

कान्होळी नदीवर उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याची बारा मीटरपर्यंत उंची वाढवण्यात आली. तर सुमारे ५५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन सुमारे अडीच किलोमीटरपर्यंत पाण्याचा संचय होईल.

यामुळे सुमारे तीनशे हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येऊन येथील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सुटण्यास मदत होऊन शेतमजुरांना हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे कान्होळी धरणावर मेळवण धरणांची निर्मिती होण्याची मागणी अनेक वर्षांपासून येथील शेतकरी करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com