Paddy Producer Farmer : शेतकऱ्यांच्या बोनससाठी प्रयत्नशील ः पवार

मुरबाडला भात खरेदी केंद्राचे उद्‌घाटन
Paddy Producer Farmer
Paddy Producer FarmerAgrowon

सरळगाव : ठाणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या (Paddy Producer) मागील दोन वर्षांच्या बोनससाठी शासनाकडे प्रयत्न करणार, असे आश्वासन माजी आमदार गोटीराम पवार (Gotiram Pawar) यांनी दिले. मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघ (Murbad Taluka Farmers' Co-operative Union) मुरबाडच्या वतीने केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत भात खरेदी योजना २०२२-२३ अंतर्गत भात खरेदी केंद्राचे उद्‌घाटन १ डिसेंबर रोजी मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.

Paddy Producer Farmer
Farmer Welfare : केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील

ठाणे जिल्ह्यातील धान (भात) उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मागील दोन वर्षे सानुग्रह अनुदान राज्य शासनाने दिलेले नाही. त्यासाठी मुरबाड, शहापूर, कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी संघाचे चेअरमन किसन गिरा, माजी चेअरमन पांडुरंग कोर, रामभाऊ दळवी, प्रकाश पवार, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत सासे, शिवसेना तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे आदी उपस्थित होते.

Paddy Producer Farmer
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणार - अजित पवार

४३५८ शेतकऱ्यांची नोंदणी

या वर्षी मुरबाड केंद्रात ४३५८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सात-बारावर २०२२- ई पीकपेरा पाहणी नोंद केली असेल, त्याच शेतकऱ्यांचे भात केंदावर घेतले जाईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी हनुमंत पवार यांनी सांगितले. या वर्षी शेतकऱ्यांना भात खरेदी हमीभावाचे पैसे लवकरात लवकर मिळवून द्यावे, अशा सूचना माजी आमदार गोटीराम पवार यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com