Salty Soil : क्षारपडमुक्त जमिनीसाठीचे प्रयत्न उल्लेखनीय

पाणी आणि खताचा अतिवापर झाल्यामुळे जमिनी खराब झाल्या आहेत. जमिनीतील क्षार आणि पाणी बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी सच्छिद्र निचरा प्रणाली उपयुक्त आहे.
Soil
SoilAgrowon

शिरोळ, जि. कोल्हापूर : ‘‘पाणी आणि खताचा (Fertilizer) अतिवापर झाल्यामुळे जमिनी (Soil) खराब झाल्या आहेत. जमिनीतील क्षार आणि पाणी बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी सच्छिद्र निचरा प्रणाली उपयुक्त आहे. आगामी काळात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे चांगल्या जमिनीमध्ये सुद्धा सच्छिद्र निचरा प्रणाली करण्याची आवश्यकता भासेल. शेडशाळ आणि कवठेगुलंद येथील शेतकऱ्यांनी क्षारपडमुक्त जमिनीसाठी सुरू केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत,’’ असे प्रतिपादन श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.

Soil
Soil Test : माणगावात ‘माती परीक्षण प्रयोगशाळा’ उभारणार

सहकारमहर्षी डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या १०१ व्या जयंतीचे औचित्य साधून शेडशाळ येथील दुसऱ्या टप्प्यातील २५० एकर व कवठेगुलंद येथे पहिल्या टप्प्यातील २०० एकर जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत सर्व्हे कामाचे उद्‌घाटन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या क्षारपड मुक्तीच्या दत्त पॅटर्नची माहिती दिली. संचालक विश्वनाथ माने, देवगोंडा पाटील, कीर्तीवर्धन मरजे, अविनाश कदम, बाबगोंडा पाटील, संचालक भैय्यासाहेब पाटील, सरपंच प्रमिला जगताप, उपसरपंच गुरुपाद केटकाळे, नासर पठाण, सुभाष शहापुरे, बापू बोरगावे, रावसो चौगुले, बाळासो बोरगावे, कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com