आंबा, काजू बागायतदारांना मदतीचे ‘पॅकेज’ देण्यासाठी प्रयत्नशील ः सामंत

गणपतीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन त्यात आंबा, काजू बागायतदारांच्या समस्यांवर तोडगा काढला जाईल. तसेच बागायतदारांना शासनाकडून पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,’’ असे आश्‍वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
Mango Cashew
Mango CashewAgrowon

रत्नागिरी ः ‘‘गणपतीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे बैठक घेऊन त्यात आंबा (Mango), काजू (Cashew) बागायतदारांच्या समस्यांवर तोडगा काढला जाईल. तसेच बागायतदारांना शासनाकडून पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,’’ असे आश्‍वासन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले.

Mango Cashew
Cashew Processing: शून्यातून उभारलेला काजू प्रक्रिया उद्योग पोहोचला एक कोटीपर्यंत...

बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अल्पबचत सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, ज्येष्ठ बागायतदार काका मुळ्ये, डॉ. विवेक भिडे, प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे, तुकाराम घवाळी, नंदू मोहिते, बावा साळवी यांच्यासह अनेक बागायतदार आणि निबंधक, कृषी, पणनचे अधिकारी उपस्थित होते.

Mango Cashew
Mango : आंबा नर्सरी व्यवसायाची शोधली नामी संधी

आंब्याला हमीभाव मिळावा, वानरांचे निर्मूलन, निवळी-जयगड रस्त्याची दुरवस्था, असे प्रश्‍न मुळ्ये यांनी मांडले. यावर मंत्री सामंत म्हणाले, ‘‘बागायतदारांचे काही प्रश्‍न सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. ते मुख्यमंत्र्यांपुढे मांडून त्यावर तोडगा काढला जाईल. त्यासाठी बागायतदारांच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक व्हावी. शक्य झाल्यास ही बैठक सोमवारी (ता. २९) किंवा मंगळवारी (ता. ३०) आयोजित करण्यात येईल.’’

दरम्यान, बागायतदारांनी व्याजमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावरही मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले. ‘‘लवकरच बँका आणि बागायतदारांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करू. यामध्ये कोणत्या बँका सकारात्मक आहेत, याची पडताळणी करू. त्या वेळी पन्नास टक्के आंबा पीक बाधित असल्याचे शासनाला पाठवलेले पत्र कृषी विभागाने सादर करावे,’’ अशी सूचना सामंत यांनी केली.

आंब्याप्रमाणे काजू बोंडापासून वाइन करण्यासंदर्भातील शासन निर्णय करावा. ओले काजू सोलण्यासाठीच्या मशीनसाठी ५० टक्के अनुदान, हमीभाव मिळावा, अशा मागण्या काजू बागायतदारांनी केल्या.

सामंत यांची आश्‍वासने अशी...

बागायतदारांना कायमस्वरूपी मदतीसाठी प्रयत्न.

वानरांपासून संरक्षणासाठी सोलर योजना.

मच्छीमारांप्रमाणे बागायतदारांना अनुदानावर इंधन.

रत्न सिंधू योजनेतून बागायतदारांसाठी योजना.

चार वातानुकूलित व्हॅनसाठी १ कोटी ५७ लाख देऊ.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com