Ajit Pawar : बारामतीत अत्युत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न

विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून आगामी काळात अत्युत्तम दर्जाचे शिक्षण मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, सर्वांना बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या सर्व संधी मिळतील, असा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
Ajit Pwar
Ajit PwarAgrowon

बारामती, जि. पुणे ः विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या (Vidya Pratishtan Baramati) माध्यमातून आगामी काळात अत्युत्तम दर्जाचे शिक्षण (Best Quality Education) मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, सर्वांना बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या सर्व संधी मिळतील, असा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव अँड. नीलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज या प्रसंगी उपस्थित होते.

Ajit Pwar
Ajit Pawar : पशुधनावरील गंभीर धोका दूर करा ः अजित पवार

पन्नास वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याच दिवशी म्हणजे १६ ऑक्टोबर १९७२ रोजी या संस्थेचा पाया रचला होता, असे सांगून अजित पवार यांनी संस्थेच्या सर्वांगिण प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. संस्थेच्या प्रगतीत सिंहाचा वाटा असलेल्या हयात असलेले व नसलेल्या सर्वांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Ajit Pwar
Ajit Pawar : पुणे जिल्ह्यातील १७ उत्कृष्ट सहकारी संस्थांना ढाली

या पुढील काळातही बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने केला जाईल, उत्तम दर्जा राखत सर्व सुविधा विद्यार्थी व शिक्षकांना देण्याचा प्रयत्न केला जाईल, शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान देण्यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्या प्रतिष्ठानमध्ये काळाची पावले ओळखून सेंटर ऑफ एक्सलेन्सची उभारणी होत आहे, आपली मुले काळाच्या गतीसोबत राहायला हवीत या उद्देशाने त्यांना उत्तमातील उत्तम ज्ञान देण्याचा प्रयत्न संस्था करत आहे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात अँड. नीलीमा गुजर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेच्या विद्यादीप या नियतकालिकाच्या २५ व्या अंकाचे प्रकाशन या प्रसंगी पवार यांच्या हस्ते झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com