Pune News : खडी मशिन विरोधात उतरले पुरंदर तालुक्यातील आठ गावे

पुरंदर तालुक्यातील गुळुंचे कर्नलवाडीसह आठ गावच्या ग्रामस्थांचा विरोध असतानाही गुळुंचे येथील नियोजित खडी मशिनमालकाच्या खडी मशिन उभारण्याच्या हालचाली सुरूच आहेत.
Stone Crusher
Stone CrusherAgrowon

Stone Crushing नीरा, जि. पुणे : पुरंदर तालुक्यातील गुळुंचे कर्नलवाडीसह आठ गावच्या ग्रामस्थांचा विरोध असतानाही गुळुंचे येथील नियोजित खडी मशिनमालकाच्या खडी मशिन (Stone Crusher) उभारण्याच्या हालचाली सुरूच आहेत.

खडी मशिनमालकाने नियोजित खडी मशिनच्या ठिकाणी मागील आठवड्यात जिलेटीनचा स्फोट (Gelatin Blast) उडवल्याने बोलाइमातेच्या प्राचीन गुहेत हादरे बसले होते.

Stone Crusher
Stone Mine : दगडखाण पुन्हा सुरू करण्याचा घाट

ग्रामस्थांनी यानंतर प्रशासनाला खडी मशिन विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या बाबत बैठक नियोजित केले होते. यानिमित्ताने ग्रामस्थांनी या खडी मशिन विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी (दि. २२) दाद मागितली आहे.

बारामती तालुक्यातील एक व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून गुळुंचे हद्दीत खडी मशिन सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र गुळुंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी, पिंपरे, थोपटेवाडी, वाल्हे, सुकलवाडी, कामठवाडी या गावातील लोकांचा या नियोजित खडी मशिनला विरोध आहे.

या खडी मशिन विरोधात सर्व पक्षीय कार्यकत्यांसह ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत असून, ग्रामस्थांनी पुरंदरच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (दि. २७) उपोषण करत असल्याचा इशारा दिला आहे.

Stone Crusher
Sand Mafia : वाळू चोरीविरोधात कारवाईचे सत्र

महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा असलेल्या गुळुंचे व कर्नलवाडी गावच्या पश्‍चिम बाजूला डोंगरावर प्राचीन गुहेमध्ये बोलाईमातेचे जागृत देवस्थान आहे. राज्यभरात फक्त दोनच ठिकाणी बोलाईमातेची जागृत देवस्थान आहे.

या देवस्थानच्या पायथ्याला मेंढपाळांच्या चराऊ जमिनी कवडीमोल भावात खरेदी करून मागील तीन वर्षांपासून खडी मशिनचा घाट घातला जात आहे.

मात्र या खडी मशिनच्या होणाऱ्या स्फोटांमुळे हृदयांनी होणाऱ्या बोलाईमातीचे गुहा धोक्यात येऊ शकते, हे लक्षात घेता ग्रामस्थांनी खडी मशिन या परिसरात होऊच नये असा ठराव नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत घेतला आहे. या ठरावाला दोन्ही गावचे प्रमुख व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने खडी मशिन या परिसरात होऊच नये असा ठराव संमत केला.

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्‍वासन

मागील महिन्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि नुकतेच खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन खडी मशिनला विरोध असल्याचे सांगितले आहे.

या पाचही गावांतील प्रतिनिधीनी बुधवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन खडी मशिनाला परवानगी देऊ नका व अशा प्रकारे खडी मशिन सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तर जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबत माहिती घेऊन योग्यता कार्यवाही करण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com