Crop Damage : अठरा हजार अतिवृष्टिग्रस्तांना मिळणार ११ कोटींची मदत

या वर्षी जून, जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते.या नुकसानीपोटी जिल्ह्यातील सुमारे १८ हजार शेतकऱ्यांना ११ कोटी २४ लाखाची मदत मिळणार आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

येवला : या वर्षी जून, जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान (Agriculture Damage) झाले होते.या नुकसानीपोटी जिल्ह्यातील सुमारे १८ हजार शेतकऱ्यांना ११ कोटी २४ लाखाची मदत मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नव्या दराने ही मदत दिली जाणार आहे

Crop Damage
Crop Damage : शेतीपिकांच्या नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करा

राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे २३ लाख ८१ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे वाढीव व दुप्पट दराने ही मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना मंजूर मदत तातडीने वितरित करण्याचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे.

...असे झाले जिल्ह्यात नुकसान...

जिरायती शेती ः

नुकसानग्रस्त शेतकरी १७०५३

बाधित क्षेत्र ७७७० हेक्टर

आवश्यक निधी १०५६ लाख

सिंचनाखालील शेती ः

नुकसानग्रस्त शेतकरी १३५३

बाधित क्षेत्र १९६ हेक्टर

आवश्यक निधी ५३ लाख

बहुवार्षिक पिके शेती ः

नुकसानग्रस्त शेतकरी ६१

बाधित क्षेत्र ३९ हेक्टर

आवश्यक निधी १४ लाख

एकूण नुकसान व निधी

नुकसानग्रस्त शेतकरी १८४६७

बाधित क्षेत्र ८००६ हेक्टर

आवश्यक निधी ११२४ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com