Taloda News : अहवालाच्या अठरा वर्षांनंतरही पुलाचे काम अपूर्ण

पुनर्वसन करणे अवघड प्रक्रिया असते त्यात वेळ जातो, लोकं विखुरली जातात. त्यामुळे सावऱ्यादिगर ग्रामस्थांचा समस्या दूर करण्यासाठी तेथे पूल व रस्ता तयार करण्याचा अहवाल सावऱ्यादिगर टापू परिसर समितीने दिला होता.
Taloda News
Taloda NewsAgrowon

Taloda News तळोदा: पुनर्वसन (Rehabilitation) करणे अवघड प्रक्रिया असते त्यात वेळ जातो, लोकं विखुरली जातात. त्यामुळे सावऱ्यादिगर ग्रामस्थांचा (Villagers) समस्या दूर करण्यासाठी तेथे पूल व रस्ता तयार करण्याचा अहवाल सावऱ्यादिगर टापू परिसर समितीने दिला होता.

मात्र अहवाल देऊन अठरा वर्ष लोटली तरीही पुलाचे काम (Bridge Work) पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्या निर्णयाचा आता मला पश्चात्ताप होतोय असे उद्विग्न उद्गार सावऱ्यादिगर टापू परिसर समितीचे अध्यक्ष सतीश भिंगारे यांनी काढले.

नर्मदा जीवनशाळांचा बालमेळावा निमित्त वाल्मीचे भूतपूर्व डायरेक्ट जनरल तथा इंजिनिअर इन चीफ सतीश भिंगारे जिल्ह्यात आले होते. त्यांना नर्मदा जीवनशाळा व परिसराचा दौरा करायचा होता.

त्यानुसार त्यांनी गुरुवारी (ता. १६) मध्य प्रदेशच्या बुडीत क्षेत्राचा दौरा केला व त्यानंतर बोटीने सावऱ्यादिगर येथे पोहोचले.

त्याठिकाणी नर्मदा बचाओ आंदोलनाचे मान्या पावरा, डेकल्या पावरा, गुलाबसिंग पावरा, दिलीप पावरा, रोहिदास पावरा, वीरसिंग पावरा, रुमाल्या पावरा, वादऱ्या पावरा, सियाराम पाडवी, चेतन साळवे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Taloda News
Water Importance: जमिनीएवढेच महत्त्व पाण्याच्या उत्पादकतेला

टापू समितीचा २००५ ला अहवाल

दरम्यान सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील सावऱ्यादिगर, सादरी, भमाणे, उडद्या, भादल गावे सरदार सरोवरमुळे नेहमीच संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातात. त्यामुळे येथील ग्रामस्थांची पुनर्वसन करण्याची मागणी होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे पुनर्वसन

करणे शक्य नसल्याने गावातच आरोग्य, शिक्षण, पाणी, दळणवळणासाठी रस्ता व पूल बनवून दिला तर ग्रामस्थांचे प्रश्न सुटतील या अपेक्षेने सावऱ्यादिगर टापू परिसर समितीने २००५ ला

पूल बनविण्याचा अहवाल सादर केला होता. परंतु, तब्बल १८ वर्षानंतर देखील पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. या दरम्यान बऱ्याच वेळा आंदोलन झाली, पत्रव्यवहार झाले, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. परंतु पुलाचे काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आम्ही पिढ्यानपिढ्या येथे राहतो, आमच्या गावचे वनाधिकार अंतर्गत ३३८ दावे दाखल आहेत. परंतु फक्त ८ दावे पात्र झाले आहेत. आमच्या गावातील पाटील पाडा बुडितात जात असल्याने तेथील कुटुंबाचे जमिनीला जमीन देऊन पुनर्वसन झाले आहे. शासन आम्हाला अत्यंत वाईट वागणूक देत आहे.

- दिलीप पावरा, सरपंच.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com