Neera APMC News : नीरा बाजार समितीच्या सभापतिपदाची आज निवडणूक

APMC Election : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड आज (सोमवारी) होणार आहे.
Neera APMC
Neera APMC Agrowon

Pune Neera News : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड आज (सोमवारी) होणार आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आज रोजी सकाळी ११.३० वाजता पुरंदरचे सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापतिपदाची निवडप्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाविकास आघाडीची निर्विवाद १८ - ० सत्ता प्रस्थापित झाली असून, पहिले सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसला की काँग्रेसला मिळणार याकडे पुरंदर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. इच्छुकांकडून आपापल्या पद्धतीने पक्षश्रेष्ठींकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.

Neera APMC
APMC Election Result : बच्चू कडूंचे चांदूर बाजार बाजार समितीवर वर्चस्‍व, सभापतीपदी राजेंद्र याऊल

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेसने निर्विवाद १८ जागांवर विजय मिळवला. या बाजार समितीत पुरंदरची १००, तर बारामतीची ३२ गावांचे कार्यक्षेत्र आहे. पुरंदर राष्ट्रवादीचे ५ व बारामती राष्ट्रवादीचे ५, असे एकूण १०; तर पुरंदर काँग्रेसचे ८ संचालक आहेत.

Neera APMC
Jalgaon APMC : जळगाव बाजार समितीच्या सभापतिपदी निवडीला गालबोट

मावळते अध्यक्ष बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीचे मुरलीधर ठोंबरे होते. तसेच मागील काळात पहिली संधी कॉंग्रेसच्या नंदू जगताप यांना दिली होती. त्यामुळे या वेळी पहिल्यांदा सभापतिपदी पुरंदरमधील राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या संचालकाची वर्णी लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सभापती पदासाठी दोन्ही पक्षातून अशोक निगडे, संदीप फडतरे, देविदास कामठे, बाळासाहेब जगदाळे, वामन कामठे, शरद जगताप ही नावे आघाडीवर आहेत. उपसभापतिपदासाठी मनीषा नाझीरकर, शाहजान शेख, शरयू वाबळे या तीन महिला किंवा गणेश होले, भाऊसाहेब गुलदगड, महादेव टिळेकर, अशा अन्य प्रवर्गातील संचालक असू शकतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com