
इस्लामपूर, जि. सांगली : माजी मंत्री, आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली चौफेर घोडदौड करणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक (Election of Rajarambapu Factory Election) बिनविरोध झाली.
आमदार पाटील यांनी अर्ज काढून घेत कुटुंबातील सदस्य, चिरंजीव प्रतीक यांना संधी दिली. अन्य १७ उमेदवारांनी मंगळवारी (ता. ७) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
प्रतीक यांच्यासह तरुण, उच्चशिक्षित अशा १३ नव्या चेहऱ्यांची संचालक मंडळात एन्ट्री झाली आहे. तर जुन्या ८ संचालकांना पुन्हा संधी मिळाली.
बिनविरोध निवड झालेले गटवार संचालक : इस्लामपूर गट क्र. १ : प्रताप शामराव पाटील (तांदूळवाडी), शैलेश शामराव पाटील (इस्लामपूर), बोरगाव गट क्र.२ ः विजयराव बळवंत पाटील (साखराळे), विठ्ठल भगवान पाटील (बहे), कार्तिक मानसिंगराव पाटील (बोरगाव), आष्टा
गट क्र.३ : प्रदीपकुमार विश्वासराव पाटील (शिगाव), रघुनाथ पांडुरंग जाधव (आष्टा), बबन जिनदत्त थोटे (आष्टा), कुरळप गट क्र. ४ : रामराव ज्ञानदेव पाटील (कार्वे), दीपक पांडुरंग पाटील (कुरळप), अमरसिंह शिवाजीराव साळुंखे (करंजवडे), पेठ गट क्र. ५ : प्रतीक जयंत पाटील (कासेगाव), अतुल सुधाकर पाटील (पेठ), कुंडल गट क्र.
६ : सतीश ऊर्फ दादासाहेब यशवंत मोरे (रेठरेहरणाक्ष), प्रकाश रामचंद्र पवार (कुंडल). ब वर्ग संस्था गट : देवराज जनार्दन पाटील (कासेगाव), अनुसूचित जाती : राजकुमार वसंत कांबळे (इस्लामपूर), महिला राखीव गट : मेघा मधुकर पाटील (शिगाव), डॉ. योजना सचिन शिंदे (कणेगाव), भटक्या विमुक्त जाती-जमाती गट : अप्पासो विष्णू हाके (कारंदवाडी), इतर मागासवर्गीय गट : हणमंत शंकर माळी (इस्लामपूर).
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी जबाबदारी पाहिली. सहायक उपनिबंधक रंजना बारहाते, बी. डी. मोहिते, सहायक सोमनाथ साळवी यांनी सहकार्य केले. एकूण ६ गटांतून २१ संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल ऊस उत्पादक सभासद व ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेले प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील यांचे आभार मानले.
जयंत पाटलांच्या निर्णयाचे स्वागत
जयंत पाटील यांनी संचालक मंडळ निवडणूक प्रक्रियेत अर्ज दाखल केला. परंतु अंतिम माघार प्रक्रियेत नव्या, तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका घेत अर्ज काढून घेतला. त्यांचे पुत्र प्रतीक आणि चुलत बंधू देवराज यांना प्रतिनिधित्व दिले. स्वतः माघार घेण्याच्या भूमिकेविषयी आश्चर्य व निर्णयाचे स्वागत अशी संमिश्र प्रतिकिया आहे.
उच्चशिक्षित चेहऱ्यांना प्राधान्य
अतुल पाटील (पेठ), दीपक पाटील (कुरळप), शैलेश पाटील (इस्लामपूर), अमरसिंह साळुंखे (करंजवडे), बबनराव थोटे (आष्टा), रघुनाथ जाधव (आष्टा), अप्पासो ऊर्फ रमेश हाके (कारंदवाडी), डॉ. योजना पाटील (इस्लामपूर), प्रताप पाटील (तांदूळवाडी), रामराव पाटील (कार्वे), राजकुमार कांबळे (इस्लामपूर), हणमंत माळी (इस्लामपूर) या नव्या व उच्चशिक्षित चेहऱ्यांना संचालक मंडळात संधी देण्यात आली.
दृष्टिक्षेपात निवडणूक
एकूण सभासद १२ हजार ५००, इच्छुक उमेदवार : १५९, संचालक २१, दाखल अर्ज : ४३, माघार : २२.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.