Sangola Election : सांगोला शेतकरी सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध

१७ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने घोषणा
Sangola Election
Sangola Election Agrowon

सांगोला, जि. सोलापूर ः सांगोला (Sangola) शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (ता. २७) १७ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने सूत गिरणीची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर आशिया खंडातील उत्कृष्ट सूत गिरणी म्हणून या गिरणीचा लौकिक आहे. उत्पादनासह अनेक विक्रम या गिरणीच्या नावावर आहेत.

Sangola Election
Cotton Picking : कापूस वेचणीला झाली सुरुवात

शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच ही निवडणूक होत होती. स्थापनेपासूनच शेतकरी सहकारी सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होत आली आहे. त्यांच्यानंतर ही परंपरा खंडित होणार की पुढे कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, परंतु बिनविरोधची परंपरा कायम राहिल्याने सभासदातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. माजी आमदार देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख आणि त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख यांना त्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याचे सांगण्यात येते. बाबासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर सर्वच पक्षांनी बिनविरोधसाठी मदत केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगण्यात आले. सूतगिरणीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी १७ जागेसाठी यंदा सर्वाधिक ७३ अर्ज दाखल झाले होते. त्यातच गिरणीचे माजी अध्यक्ष नानासाहेब लिगाडे, बाबूराव गायकवाड, शहाजी जाधव यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी ऐनवेळी निवडणुकीत माघार घेतल्याने बिनविरोधचा पेच वाढतो की काय, अशी शंका उपस्थित झाली होती. पण अखेरीस ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

नवे संचालक मंडळ

कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघ ः चंद्रकांत गणपतराव देशमुख (सांगोला), अण्णासाहेब गणपतराव देशमुख (सांगोला), संतोष शांताराम पाटील (महूद), नितीन कृष्णा गव्हाणे (कडलास), भारत हणमंत बंडगर (अनकढाळ), बाबासो रामचंद्र करांडे (लोटेवाडी), विश्वंभर नारायण काशीद (पंढरपूर),

बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघ ः मधुकर विठ्ठल कांबळे (सांगोला), अंकुश लक्ष्मण बागल (खिलारवाडी), विक्रांत महादेव गायकवाड (कडलास), दिलीप शिवाजी देशमुख (कोळे), संस्था प्रतिनिधी मतदार संघ- सागर भगवान लवटे (लोटेवाडी), अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ- बाळासाहेब संदिपान बनसोडे (सांगोला), महिला राखीव मतदार संघ- ताई शिवाजी मिसाळ (पाचेगाव), सीतादेवी सुनील चौगुले (गुंजेगाव, ता. मंगळवेढा), इतर मागासवर्गीय मतदार संघ-प्रभाकर एकनाथ माळी (सांगोला), विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदार संघ- कुंडलिक पंढरी आलदर (कोळे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com